तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 9 October 2019

आ दुर्रानी,वरपुडकर यांच्या उपस्थित राकाँ नगरसेवक पदाधिकारी यांची बैठक संपन्न


प्रतिनिधी
पाथरी:-शहरातील दुर्रानी पेट्रोल पंपावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवक आणि शहरातील पदाधिकारी यांची बैठक बुधवार १० ऑक्टोबर रोजी सायंकाळी आ बाबाजानी दुर्रानी आणि विधानसभेचे आघाडीचे उमेदवार माजी मंत्री सुरेशराव वरपुडकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
या वेळी मंचावर न प गट नेते जुनेदखान दुर्रानी,नगराध्यक्ष नितेश भोरे, प्रेरणाताई वरपुडकर,  नगरसेवक विठ्ठल रासवे,राजिव पामे यांची या वेळी उपस्थिती होती. या वेळी बोलतांना आमदार दुर्रानी यांनी न प पेक्षाही जास्त मताधिक्य मिळऊन देण्या साठी सर्वांनी कां करण्याचे आदेश दिले तर जुनेद खान दुर्रानी यांनी सर्वाधिक मताधिक्य हे पाथरी शहरातून देणार असल्याची ग्वाही या वेळी दिली. या वेळी विधानसभेचे उमेदवार माजी मंत्री सुरेशराव वरपुडकर,प्रेरणाताई वरपुडकर,विठ्ठलराव रासवे, अलोक चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष शेख खालेद यांनी केले तर सुत्र संचलन आणि आभार वक्ता सेलचे तालुकाध्यक्ष सुनिल जाधव यांनी केले.या बैठकी साठी न प चे सर्व आजी माजी नगरसेवक, राकाँचे शहरातील सर्व पदाधिकारी यांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment