तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 12 October 2019

धनंजय मुंडेंच्या विकासाच्या राजकारणापुढे विरोधकांची बोलती बंदपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  विधानसभा निवडणुकीस अवघा आठवडा उरला असताना धनंजय मुंडेंची विकासावर भाष्य करणारी बुलंद तोफ धडधडत आहे. त्यामुळे हतबल झालेल्या विरोधकांची बोलती बंद झाली आहे. एकीकडे धनंजय मुंडे फक्त परळी वैजनाथ मतदारसंघातील विकास आणि प्रगतीवर बोलत आहेत. विरोधी पक्षात असून त्यांनी मतदारसंघात केलेल्या विकास कामांची जंत्री जनतेसमोर पुराव्यानिशी मांडत आहेत. तर दुसरीकडे विरोधक केवळ हवेतील आरोप करण्याचे केविलवाणे राजकारण करत आहेत.

शहरात केलेले रस्ते, भूमिगत गटारे, आधुनिक एल इ डी पथदिवे - हाय मास्ट दिवे, दुष्काळ असून शहरी आणि ग्रामीण भागात केलेला पाणी पुरवठा, मतदार संघातील सर्व समाजांसाठी बांधलेले सभागृह, स्मशानभूमीचे नूतनीकरण, लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंग मंदिराचे नूतनीकरण, नवीन उद्यानांची उभारणी, भालचंद्र वाचनालयाचे प्रगती पथावर असलेले नूतनीकरण, नागपूर येथील वाण धरण ते शहरात घरोघरी पोहचवलेली नवीन पाईपलाईन आदी लोकोपयोगी कामे जनता स्वतः अनुभवत आहे. सोबतच आजवर लावून दिलेले सुमारे १५०० सामुदायिक विवाह सोहळे, गरजू विद्यार्थ्यांना १ लाख वह्यांचे वाटप, वेळवेळी आयोजित केलेले आरोग्य शिबिरे, वैद्यकीय मदत आदी गोष्टींचा कुठेही गाजावाजा न करता धनंजय मुंडे मनापासून जनतेसाठी अहोरात्र काम करत आहेत. 

तसेच आगामी पाच वर्षांत परळी मतदान संघातील जनतेचे उत्पन्न दुप्पट करण्याचा त्यांचा निश्चय सर्वांसमोर मांडत आहेत. आगामी पाच वर्षांत परळी वैजनाथ मतदारसंघ राज्यातील पहिल्या २० तर देशातील पहिल्या १०० विकसित मतदार संघात समाविष्ट करण्याचे त्यांचे उद्दिष्ट जनतेसमोर मांडत आहेत. एकीकडे येथील औष्णिक विद्युत केंद्र सरकारच्या निष्काळजीपणामुळे बंद पडलेले असताना सिमेंट फॅक्टरी तसेच शापोरजी पालनजी यांचा मलनाथपूर येथे सुमारे पाचशे करोड रुपयांचा सोलार प्लांट त्यांनी खेचून आणला. त्याच धर्तीवर अनेक उद्योजक त्यांच्या संपर्कात आहेत. या सर्वांना सोबत घेऊन सिरसाळा येथे औद्योगिक वसाहत (एम आय डी सी) वसवण्यासाठी धनंजय मुंडे कटिबद्ध आहेत.

हे सर्व होत असताना भाजप केवळ भावनिक राजकारण करत आहे. तसेच विनाधार व्यक्तिगत टिप्पणीत करण्यात भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे नेते धन्यता मानत आहेत. त्यामुळे भाजपच्या भूल थापांना वैतागलेला मतदार संघातील जनता म्हणत आहे "आमचं ठरलंय, धनंजय मुंडेच आमचे आमदार".

No comments:

Post a comment