तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 11 October 2019

महिलांनो भावनिक होवू नका; विकासाला मतदान करा- सौ.राजश्रीताई मुंडे पौळ पिंप्री, नाईकनगर तांडा व घनाळ तांडा येथे साधला संवादपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.11................ महिलांनी भावनिक होण्याचे दिवस आता संपले आहेत, आज सामान्य कुटुंबातील महिलेनेही कणखर होवून समाजाचा, कुटुंबाचा, रोजगाराचा विचार गरज आली आहे, त्यामुळे माझ्या माता-भगिणींनी यावेळी भावनिक न होता आपल्या गावाचे, आपल्या घराचे, आपल्या कुटुंबाचे कोण भले करू शकतो ? याचा विचार करून यासाठी कष्ट घेणार्‍या धनंजय मुंडे यांना विजयी करा असे आवाहन सौ.राजश्रीताई मुंडे यांनी केले आहे.

परळी तालुक्यातील पौळ पिंप्री, नाईकनगर तांडा, घनाळतांडा येथे त्यांनी गुरूवारी सायंकाळी महिला मतदारांशी संवाद साधला, त्यावेळी त्या बोलत होत्या. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे, तालुकाध्यक्ष लक्ष्मणराव पौळ, वैजनाथ पौळ, प्रभाकर पौळ, राजेभाऊ पौळ, सरपंच दिनकर अंबुरे, उपसरपंच जगन्नाथ अंबुरे, संजय भद्रे, भानुदास कुकडे, विष्णु पौळ, भास्कर अंबुरे, दत्ता कुकडे, भिमराव आवाड, लक्ष्मण खंडागळे, दगडूभाई शेख, भास्कर मिसाळ, अशोक मुळे, बाळकृष्ण गव्हाणे, उध्दवराव अंबुरे, मारोती अंबुरे, बबन आबुज, राजाभाऊ अंबुरे, संतोष पोटफोडे, बंडु वाघमारे, दत्ता मिसाळ, गणेश राऊत, गोविंद गायकवाड, रामडू पौळ आदी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment