तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 6 October 2019

उज्वल सुरक्षित भविष्यासाठी पंकजाताईंना आशीर्वाद द्या- खा.डॉ.प्रितमताई मुंडे
 प्रचारार्थ खा.प्रितमताई मुंडे वाड्या वस्त्यांवर

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.०५----ग्रामविकास व महिला बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ना.पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारानिमित्त खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी (दि.०५ रोजी) परळी मतदार संघातील वाड्या वस्त्यांना भेटी देऊन मतदारांशी संवाद साधला. मतदार संघाच्या उज्वल व सुरक्षित भविष्यासाठी ना.पंकजाताई मुंडे यांना आशीर्वाद देऊन विकासपर्व गतिमान करा असे आवाहन यावेळी खा.प्रितमताई मुंडे यांनी मतदारांशी संवाद साधताना केले.

परळी विधानसभा मतदार संघाच्या महायुतीच्या उमेदवार ग्रामविकास मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ परळी तालुक्यातील तडोळी,तडोळी तांडा,माळहिवरा,वाघाळा,कावळेवाडी,सरफराजपुर,करेवाडी,गडदेवाडी,मोहा,वंजारवाडी,नागपिंप्री या गावांना भेटी देऊन खा.प्रितमताई मुंडे यांनी मतदारांशी संवाद साधला. याप्रसंगी मतदारांशी संवाद साधताना खा.प्रितमताई म्हणाल्या “ना.पंकजाताई मुंडे यांनी पाच वर्षात मतदार संघाचा सर्वसमावेशक विकास करत असताना सर्वांना सोबत घेऊन सामाजिक सामाजिक संतुलन राखत सर्व समाजाना प्रतिनिधित्व दिले आहे.मतदार संघातील  शेतकरी पेंशन, पीक विमा,उसबील असे सर्व प्रश्न मार्गी लागले असून विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता विकासाच्या निकषावर पंकजाताईंच्या पाठीशी उभे राहा असे आवाहन खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी केले.

याप्रसंगी गोपाळपुर येथे माळहिवरा गोपाळपुर ग्रुप ग्राम पंचायतचे उपसरपंच रामप्रसाद नवगरे यांच्यासह बाबुराव धायगुडे,सुंदर धायगुडे,गंगाधर धायगुडे,भागवत नवगरे,शेषेराव नवगरे,भास्कर धायगुडे व ग्रामस्थांनी ना.पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिट्टी देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
यावेळी श्रीहरी मुंडे,जीवराज ढाकणे,बळीराम गडदे,नितीन ढाकणे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.याप्रसंगी गावोगावी मोठ्या उत्साहात ढोल ताश्यांच्या निनादात व फटाक्यांच्या आतिषबाजीत खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

No comments:

Post a comment