तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 19 October 2019

परळीत सभा संपवून व्यासपीठावरून ना.पंकजाताई मुंडे यांना उतरताना अचानक चक्कर

वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
आपल्या निवडणूक प्रचाराची समारोपाची सभा संपली आणि मंत्री पंकजा मुंडे व्यासपीठावरून खाली उतरत असताना अचानक अस्वस्थ झाल्या व स्टेजवरच त्यांना चक्कर आली. काही वेळात प्रथमोपचारानंतर त्या यशश्री निवासस्थानी गेल्या
आहेत. 
   विधानसभा निवडणुकीत प्रचाराची परळीत समारोप सभा झाली. राणी लक्ष्मीबाई टॉवर येथील या सभेला मंत्री पंकजा मुंडे यांनी संबोधित केले. आपल्या जन्मभूमीतील या सभेत राजकीय भाषणे पेक्षा आपल्या मनातील सर्व सलणा-या गोष्टी मांडताना त्यांना संपूर्ण भाषणात आपल्या भावना व्यक्त करताना त्या प्रचंड भावूक झाल्या होत्या.

सकाळपासून विविध ठिकाणी सभा घेऊन त्या परळीत आल्या होत्या. सभा संपवून व्यासपीठावरून उतरताना अचानक चक्कर आली व त्या अस्वस्थ झाल्या. यावेळी पती डॉ. अमित पालवे, खा. डॉ. प्रीतम मुंडे आदींसह पदाधिकारी सोबत होते. काही वेळात प्रथमोपचारा नंतर त्या यशश्री निवासस्थानी गेल्या आहेत.

No comments:

Post a Comment