तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 8 October 2019

विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर साईचरणी नतमस्तक होत डॉ शिंदेंचा प्रचार प्रारंभ

प्रतिनिधी
पाथरी:-विधानसभा मतदार संघातून अपक्ष म्हणून निवडणुक रिंगणात उतरलेले समाजसेवक डॉ जगदीश शिंदे यांनी मंगळवारी विजयादशमी निमित्त सायंकाळी श्रीसाईबाबा जन्मस्थान मंदिरात सहकुटूंब श्रीसाई चरणी नतमस्तक होत निवडणुक प्रचाराचा शुभारंभ केला.
यावेळी पत्नी डॉ श्रुती जगदीश शिंदे आणि त्याने दोन्ही मुलं त्यांच्या सोबत होते. या वेळी बोलतांना ते म्हणाले की गेली मी शेतकरी भुमीपुत्र असून दहा वर्षा पासून आपण जनसेवक म्हणूनच काम करत आलो आहोत. मी आश्वासनां पेक्षा कृतीवर भर देणारा आहे. आगोदर जनतेची सेवा केली आहे,करत आहे.या पुढे हीच सेवा अजून गतीने करण्या साठी मतदार संघातील मायबाप मतदार सुशिक्षित असलेला युवा वर्ग मोठ्या प्रमाणात मला पाठबळ देऊन निश्चित विजयी करेल. आपले प्राधान्य हे या मतदार संघातील,शेतकरी, कष्टकरी, सुशिक्षित बेरोजगार, निराधार नागरीक,शिक्षण,रस्ते,उद्योग या वर प्राधान्याने असनार आहे. त्या मुळे जनतेला मला मतदिल्याचा अभिमान वाटावा अशीच कामगिरी करणार असल्याचे ते म्हणाले. या नंतर मानवत येथील दसरा मैदान आणि पाथरी येथील दसरा मैदानावर उपस्थित राहून त्यांनी उपस्थित नागरीकांना शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a comment