तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 10 October 2019

महाराष्ट्र विधानसभा २०१९ निवडणुकीतील अटीतटीच्या लढतीवर एक नजर


बाळू राऊत प्रतिनिधी 
मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत अनेक हौसे नौसे गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. आमदार पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे आता येणार्या २४ तारखेला सजणार आहे. या निवडणुकीत काका पुतणे,बहीण भाऊ, भाऊ भाऊ मामा भाचे असे अनेक नाते असणारे मंडळी देखील लढत आहे. हे झाले सर्वसामान्य माणसाचे पण या निवडणुकीत अनेक दिग्गज एकमेकां समोर उभे आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना नेते आदित्य ठाकरे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार, छगन भुजबळ,रोहित पवार, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, जयदत्त क्षीरसागर,राम शिंदे, यांसारख्या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 
एक नजर संभाव्य अटीतटीच्या लढतीवर आणि तेथील उमेदवारावर 
वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे 
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मुंबईतील वरळीतील जागा चर्चेत आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे रिंगणात उतरले आहेत. आदित्य हे ठाकरे घराण्यातील निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती असतील. आदित्य ठाकरे यांच्याविरोधात तब्बल १९ उमेदवार रिंगणात आहेत. आदित्य ठाकरेंविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि बहुजन समाज पक्षाने उमेदवार दिले आहेत.
 नागपूर दक्षिण पश्चिम देवेंद्र फडणवीस विरुद्ध आशिष देशमुख
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदासाठी निवडणूक रिंगणात उतरले आहेत. फडणवीस नागपूर दक्षिण पश्चिममधून उमेदवारी लढवणार आहेत. मुख्यमंत्र्यांविरुद्ध काँग्रेस उमेदवार आशिष देशमुख रिंगणात आहेत. 
 दक्षिण कराड मतदारसंघातून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विरुद्ध अतुल भोसले 
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सातारा जिल्ह्यातील दक्षिण कराडमधून निवडणूक लढवणार आहे. या जागेसाठी पृथ्वीराज चव्हाण यांना भाजपाच्या अतुल भोसले यांचे मोठे आव्हान आहे.
येवला मतदारसंघातून माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ विरुद्ध संभाजी पवार 
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची येवला विधानसभेची जागाही चर्चेत आहे. छगन भुजबळ यांच्या विरोधात शिवसेनेच्या संभाजी पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. येवला विधानसभा जागेसाठी ३० उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.
परळी मतदारसंघ  विधानसभा पंकजा मुंडे विरूद्ध धनंजय मुंडें
महिला, बालविकास मंत्री पंकजा मुंडे बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा जागेवर भाजपच्या तिकिटावर लढत आहेत. या जागेसाठी पंकजा मुंडे यांना त्यांचा चुलत भाऊ धनंजय मुंडेंचे आव्हान आहे.
बारामती मतदारसंघ अजित पवार  विरुद्ध गोपीचंद पडालकर
अजित पवार बारामतीमधून निवडणुक लढवणार आहेत. अजित पवार यांच्याविरोधात भाजपाचे तगडे उमेदवार गोपीचंद पडालकर मैदानत उतरले आहेत. 
कोथरुड मतदारसंघ चंद्रकांत पाटील विधानसभा जागेसाठी ८ उमेदवार रिंगणात आहेत 
भाजपा अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची पुण्यातील कोथरुड विभानसभेची जागा चांगलीच चर्चेत आहे. भाजपाने आमदार मेधा कुलकर्णी यांचे तिकीट कापून चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. या विधानसभा जागेसाठी ८ उमेदवार रिंगणात आहेत.

 कर्जत-जामखेड मतदारसंघ रोहित पवार विरुद्ध प्रा. राम शिंदे 
 कर्जत-जामखेड मतदारसंघात या वेळेस काटेकी टक्कर पाहण्यास मिळणार आहे. मागील दोन वर्षांपासून सतत जनसंपर्क वाढविण्याचे काम हे रोहित पवार यांनी केले आहे. काही गावांमध्ये दुष्काळाच्या वेळेस  त्यांनी टँकर पुरविले आहेत. त्यामुळे लोकांमधे त्याच्याविषयी सहानुभूती निर्माण झाली आहे. ज्यांची महाराष्ट्राचे जाणते राजे म्हणून ओळख आहे असे शरद पवार यांचे ते नातू आहेत. त्यामुळे मंत्री राम शिंदेंना नक्कीच भारी पडल्याशिवाय राहणार नाही. 
राधाकृष्ण विखे पाटील यांची अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी विधानसभेची जागाही खास चर्चेत आहे. विखे पाटील यांच्या विरोधात काँग्रेसच्या तिकीटावर सुरेश जगन्नाथ थोरात निवडणूक रिंगणात उतरले आहेत. या जागेसाठी विखे पाटील यांची जागा अतिशय तगडी मानली जात आहे.
शिवसेना नेते एकनाथ शिंदे ठाण्यातील पाचपाखाडीमधून चौथ्यांदा निवडणुक लढवणार आहे. एकनाथ शिंदे यांना काँग्रेसच्या संजय पांडुरंग घाडीगांवकर यांचे आव्हान आहे. ठाण्यात शिवसेना, भाजपाचा दबदबा आहे. या जागेसाठी ११ उमेदवार लढत देणार आहे.
बीड मतदारसंघ जयदत्त क्षीरसागर विरूद्ध संदीप क्षीरसागर,
बीडमध्ये काका जयदत्त क्षीरसागर यांच्या विरोधात त्यांचे पुतणे संदीप क्षीरसागर, गेवराईत शिवसेनेचे बदामराव पंडित विरुद्ध विजय पंडित असी लढत होणार आहे 
फुलंब्री  मतदारसंघ
महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या नावावर एक नवा विक्रम झाला आहे ते अध्यक्ष असताना सत्ताधारी पक्षात अनेक विरोधी आमदारांनी राजीनामा दिला आणि हरिभाऊ बागडे यांनी जिथे राजीनामा देणार तिथे त्यांनी स्विकारला मग ते

No comments:

Post a Comment