तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 9 October 2019

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेची तयारी पोलिस महानिरीक्षक,पोलिस अधिक्षकाकडुन तीन ठिकाणची पहाणी


 गित्ते 
--------------------------------------
परळी वैजनाथ (प्रतिनीधी) :- 
परळीत होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दि.17 ऑक्टोबर रोजी परळी येथे प्रचार सभा होण्याचे निश्चीत झाले असुन  सभेच्या तयारीला आता सुरुवात झाली आहे.सभा कोणत्या मैदानावर घ्यावयाची याची पोलिस प्रशासनाकडुन चाचपणी करण्यात येत असुन आज औरंगाबाद परिक्षेत्राचे पोलिस विशेष पोलिस महानिरीक्षक रविंद्र सिंघल व बीडचे पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी गोपीनाथगड,नागनाथअप्पा इंजिनीअरिंग कॉलेज परिसर व वैद्यनाथ कॉलेज समोरील मतदानाची पहाणी केली.पंतप्रधानांची सभा ही परळी शहरातील वैद्यनाथ कॉलेज समोरील मैदानावर होण्याची शक्यता आहे. 

  पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परळीत प्रचार सभा घेणार असल्याने सुरक्षेसाठी कुठलीच कसर राहू नये याकरिता पोलीस प्रशासन खबरदारी घेताना दिसत आहे.आज औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र सिंघल यांनी गोपीनाथ गड आणि वैद्यनाथ कॉलेज समोर असलेल्या मैदानाची पाहणी केली यावेळी बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक हर्ष पोदार हे उपस्थित होते.महायुतीच्या उमदेवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 17 ऑक्टोबर रोजी परळीत प्रचार सभा घेणार आहेत. यावेळी बीड जिल्ह्याच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे उपस्थित होत्या. याच मैदानावर अटल बिहारी वाजपेयी यांची सभा झाली होती. सभेचे ठिकाण अद्याप ठरलेले नसले तरी आज गोपीनाथ गड, वैद्यनाथ कॉलेज समोरील प्रांगणाची पाहणी प्रशासनाने केली आहे. यावेळी महानिरीक्षकांसोबत अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, संभाजीनगर पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रदीप त्रिभुवन हे यावेळी उपस्थित होते.
@@@@@@@@
परळीत प्रचारासाठी येणारे मोदी दुसरे पंतप्रधान 
 पंतप्रधान म्हणुन परळीत प्रचारासाठी येणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दुसरे पंतप्रधान ठरणार आहेत या अगोदर अटलबिहारी वाजपेयी हे मोरारजी देसाई सरकारमध्ये परराष्ट्रमंत्री झाल्यानंतर 1983 साली व पंतप्रधान झाल्यानंतर 1999 साली परळीत आले होते.वैद्यनाथ कॉलेज समोरील मैदानावर त्यांची सभा झाली होती.यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही सभा याच मैदानावर होण्याची शक्यता आहे.

╭════════════╮
   ▌प्रतिनिधी : महादेव गित्ते -
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 9403921114
              संपर्क ः- 9623921114
                     ╰════════════

No comments:

Post a Comment