तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 7 October 2019

वंचित बहुजन आघाडीचा वाशिम मंगरूळपीर मतदार संघात "कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ ठरणार का?"


तोंडगाव सर्कल मधील जनतेत उलटसुलट चर्चा

फुलचंद भगत
वाशिम- वाशिम मंगरूळपीर विधानसभा मतदार संघात उमेदवारांनी आपआपल्याल्या परीने प्रचाराचा नारळ फोडला आहे.मतदारांच्या भेटी, गाठी घेणे सुरू आहे. सद्या संपूर्ण महाराष्ट्रात वंचीत बहुजन आघाडी च्या नावाची लोकसभेप्रमाणे,विधानसभे तही मतांची मुसंडी मारण्याची चिन्हे दिसत आहेत. वाशिम, मंगरूळपीर मतदार संघात मात्र वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारास"कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ"ठरणार असल्याची चर्चा तोंडगाव सर्कलमध्ये जनतेत चर्चिल्या जात आहे.व ज्या काँग्रेसच्या पारंपारिक मतदार,निष्ठावंतानी उमेदवारांसोबत भेटी गाठी घेऊन आम्ही तुमच्यासोबतच आहो, असा आव जनतेला पहायला मिळाला.मात्र हे काँग्रेसचे कट्टर समर्थक नक्कीच वंचीतला मतदानरुपी आशीर्वाद देतील का? हा खरा प्रश्न तोंडगाव सर्कल मधील जनता उपस्थित करत आहे.यासर्व घडा मोडीकडे उमेदवारांनी लक्ष देणे आवश्यक आहे.ज्या नव्याने स्थापन करण्यात आलेल्या वंचित च्या जिल्हा, तालुका कार्यकारीणीतील  पदाधिकारी यांना अजूनही ग्रामस्तरावर कोणीही ओळखत नाही अश्या माणसाला सोबत घेऊन मतदाराच्या भेटी गाठी घेणे उमेदवारास महागात पडण्याची  शक्यता नाकारता येत नाही.म्हणून वंचित बहुजन आघाडीचा "कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ"ठरणार नाही ना?याची दक्षता उमेदवारांनी घेणे गरजेचे असल्याचे तोंडगाव सर्कल मधील जनतेत बोलल्या जात आहे.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835,8459273206

No comments:

Post a Comment