तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 28 October 2019

नेहरू युवा मंडळाने नागरिकांना दिली भ्रष्टाचार निर्मुलनाची शपथनेहरू युवा मंडळाचा पुढाकार

फुलचंद भगत
 वाशिम-(प्रतिनिधी)दि.२८रोजी युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय भारत सरकार नेहरू युवा केंद्र वाशिम संलग्नित नेहरू युवा बहुउद्देशीय मंडळ केकतउमराच्या वतीने नागरिकांना भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ नेहरू युवा मंडळाचे अध्यक्ष प्रविण पट्टेबहादुर यांच्या अध्यक्षतेखाली वाशिम बसस्थानक येथे नागरिकांना नेहरू युवा केंद्राचे वाशिम तालुका राष्ट्रीय स्वयंसेवक प्रदिप पट्टेबहादुर यांनी भ्रष्टाचार याबाबत सविस्तर माहिती दिली व कोणत्याही शासकीय कामासाठी कोणीही पैसे देऊ नये.कोणालाही देऊ न देण्याचे सांगावे,या भ्रष्टाचारामुळे सामाजिक, राजकीय वातावरण विस्कळीत होऊन जनसामान्य जिवनावर परिणाम होत असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक प्रदिप पट्टेबहादुर यांनी नागरिकांना सांगितले.पुढे बोलतांना प्रदिप पट्टेबहादुर म्हणाले की,नागरिकांनी सतर्क राहून समाजाप्रती आदर, भाव,विश्वास संपादन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.या कार्यक्रमाला नेहरू युवा मंडळाचे विक्की पट्टेबहादुर,दीपक पट्टेबहादुर,संदीप कांबळे,लखन ढाले,जित ढाले,भीमराव ढाले,यांचेसह बसस्थानकावर अनेक प्रवाशी यांनी यावेळी भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ घेतली आहे.हा सदर कार्यक्रम जिल्हा युवा समनव्यक सम्यक मेश्राम कार्यक्रम अधिकारी ओमप्रकाश कुशवाह,लेखापाल बी.एच.ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206,9763007835

No comments:

Post a comment