तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 10 October 2019

राज्यात नव्याने नोंदणी नुसार १ कोटीहून अधिक तरुण मतदार


बाळू राऊत प्रतिनिधी 
मुंबई,मतदान करण्याकरिता सर्वानी मतदार जागृती करणे खूप गरजेचे आहे आणि आणि आज युवा वर्गाने मतदान करून लोकशाही बळकट करणे गरजेचे आहे. 
 राज्यात 18 ते 25 वयोगटातील 1 कोटी 6 लाख 76 हजार 13 तरुण मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. यामध्ये 60 लाख 93 हजार 518 युवक तर 45 लाख 81 हजार 884 युवती आहेत. 611 तृतीयपंथी मतदारांची नोंदही करण्यात आली आहे.
राज्यात 4 ऑक्टोबर 2019 पर्यंत करण्यात आलेल्या मतदार नोंदणीमध्ये 8 कोटी 99 लाख 36 हजार 261  मतदारांची नोंदणी झाली आहे. या नोंदणीत एकूण 5 हजार 560 अनिवासी भारतीयांची नोंद झाली असून यामध्ये अनिवासी भारतीय पुरुष 4 हजार 54 आहेत तर 1 हजार 506 अनिवासी भारतीय महिलांची नोंद आहे.

No comments:

Post a Comment