तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 28 October 2019

कन्हेरवाडी च्या सुपुत्राचे पॅरिसमध्ये व्याख्यानपरळी वैजनाथ  (प्रतिनिधी ):-  परळी तालुक्यातील कन्हेरवाडी येथील प्रा. डॉ. भास्कर मुंडे यांना फ्रान्स या देशातील पॅरिस शहरात व्याख्यानासाठी मानाचे आमंत्रण  मिळाले, त्यानिमित्ताने सध्या पॅरिस येथे ऑप्टिकल स्टडी ऑफ  नॅनो पार्टिकल्स या अत्याधुनिक  विषयावर व्याख्यान देत आहेत.प्रा.  भास्कर राव मुंडे  हे मानवत येथील के.के. एम महाविद्यालयात प्राचार्य पदावर कार्यरत आहेत, त्यांनी पदार्थविज्ञान फिजिक्स या विषयात  ऑप्टिकल्स -तंत्रज्ञान या विषयात पीएचडी प्राप्त केली आहे. नॅनो तंत्रज्ञानात सारख्या  अत्याधुनिक  क्षेत्रात त्यांनी पुढेच अध्ययन सुरू केले असून त्यावर एक प्रबंध तयार केले आहे  यावर व्याख्यान. या विषयावर व्याख्यान देण्यासाठी त्यांनी प्रतिष्ठेच्या आंतरराष्ट्रीय पदार्थविज्ञान परिषदेत प्रमुख व्याख्याता म्हणून त्यांना आमंत्रित करण्यात आले. ही परिषद फ्रान्समध्ये पॅरिस याठिकाणी 26 आणि २७ ऑक्टोबर रोजी पॅरिस या ठिकाणी पार पडली. ते शिक्षण या क्षेत्रांमध्ये अतिशय तळमळ असलेले कै. सोपानराव लिंबाजीराव मुंडे यांचे हे सुपुत्र आहेत .मुंडे हे कुटुंब अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून शिक्षण क्षेत्रामध्ये बीड जिल्ह्याचे नाव लौकीक  केलेलं हा परिवार आहे या परिवारामध्ये त्यांचे एक बंधू न्यायाधीश या पदावर कार्यरत आहेत,दुसरे बंधू जे जे हॉस्पिटल मुंबई या ठिकाणी ह्रदय  रोगतज्ञ या पदावर ती आहेत त्यांचे छोटे बंधू श्री विश्वासराव मुंडे हे सोलापूर या ठिकाणी आयकर विभागांमध्ये सहआयुक्त या पदावर ती आहेत तर त्यांच्या पत्नी सौ दीपाताई मुधोळ-मुंडे या उस्मानाबाद येथे जिल्हाधिकारी पदावर  कार्यरत आहेत. या सर्व बंधूंना घडवण्याचे कार्य प्राचार्य भास्करराव मुंडे यांनी केलेला आहे. कन्हेरवाडी गावाचं नाव लौकिक या मुंडे परिवाराने प्रशासकीय सेवेमध्ये हे सेवेचे कार्य या परिवाराच्या वतीने घडत आहे प्राचार्य भास्करराव मुंडे  यांचे सर्वत्र कौतुक होत आहे . साता समुद्राच्या पलीकडे जाऊन या सुपुत्राने उत्तम अशी कामगिरी बजावलेली असल्यामुळे सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातुन त्यांचे अभिनंदन होत आहेत.

No comments:

Post a Comment