तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 19 October 2019

प्रस्थापित लोकप्रतिनिधीची केंद्रात व राज्यात सत्ता असून देखील वैजापूर तालुक्याचा विकास झाला नाही - डाॅ राजीव डोंगरेप्रतिनिधी । वैजापुर

केंद्रात व राज्यात सत्ता असून देखील वैजापूर तालुक्याचा विकास झाला नसल्याचा आरोप अपक्ष उमेदवार राजीव डोंगरे यांनी वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथे 18 ऑक्टोंबर शुक्रवार रोजी रात्री आठ वाजता विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ संबोधित सभेत बोलत होते याप्रसंगी ते म्हणाले की भाजप-सेना व काँग्रेस-राष्ट्रवादीची केंद्रात सत्ता असून देखील वैजापूरचे विकासाबाबत कोणताही लोक प्रतिनिधी विधिमंडळात वैजापूर तालुक्याच्या समस्येबाबत कधीही बोलला नाही यामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न होता सिंचनाचा वैजापूर तालुका साठी नांदूर मधमेश्वर प्रकल्पांतर्गत अकरा टीएमसी पाणी मिळणे आवश्यक होते परंतु या पाण्याची बराच शिकणं चोरी झाली पण आज पर्यंत लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केले होते निवडणुकीमध्ये प्रचाराचा मुद्दा म्हणून 27 वर्षापासून वैजापूर मध्ये औद्योगिक वसाहत निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगून आज पर्यंत साधे शेडही टाकण्यात आले नाही मग काय फक्त प्रचाराचा मुद्दा म्हणूनच या औद्योगिक क्षेत्राकडे बघितले जाते की काय असाही सवाल यावेळी त्यांनी केला ते पुढे म्हणाले की सत्ता नसली प्रतिनिधी खंबीर असेल तर त्याच्या तालुक्याचा प्रश्न मांडण्याची त्याची क्षमता पाहिजे तर तो आपल्या तालुक्याचा प्रश्नावर मात करू शकतो परंतु आज पर्यंत प्रतिनिधींनी तालुक्यात विकास न करता आपलाच विकास करून घेतला आहे यामुळे महाराष्ट्रामध्ये सर्वात मागासलेला तालुका म्हणून वैजापूर कडे बघितले जात आहे या सभेस परीसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या वेळी खंडाळा येथील स्व गोपिनाथ मुंडे प्रतिष्ठान च्या वतीने जाहिर पाठींबा डाॅ राजीव डोंगरे देण्यात आला.

No comments:

Post a Comment