तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 18 October 2019

धनंजय मुंडेंच्या आज शिरूर, अंबाजोगाई, लोहा व गंगाखेड येथे जाहीर सभा ; मतदारसंघात दाऊतपूर, मांडवा, सिरसाळा येथेही जाहीर सभापरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक धनंजय मुंडे हे शुक्रवारी बीड, नांदेड, परभणी या तीन जिल्ह्यात एकूण 4 सभा घेणार असून, सायंकाळी ते आपल्या परळी विधानसभा मतदारसंघातही 3 गावांमध्ये सभा घेणार आहेत.

सकाळी 09 वा. मुंडे आष्टी विधानसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार बाळासाहेब आजबे यांच्या प्रचारासाठी शिरूर येथे सभा घेणार आहेत. दुपारी 01.30 वा. अंबाजोगाईत पृथ्वीराज साठे यांच्या प्रचारासाठी होणार्‍या श्री.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या सभेस उपस्थित राहणार असून, दुपारी 03 वा. लोहा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार शंकरअण्णा धोंडगे यांच्या प्रचारासाठी होणार्‍या सभेस मार्गदर्शन करणार आहेत. सायं 05 वा. त्यांची गंगाखेड येथे डॉ.मधुसूदन केंद्रे यांच्या प्रचारासाठी सभा होणार आहे. 

सायं 06 वा. ते आपल्या परळी मतदारसंघातील दाऊतपूर, 07 वा. मांडवा तर रात्रौ 08 वा. सिरसाळा येथे जाहीर सभा घेणार असल्याचे त्यांच्या प्रचार कार्यालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

No comments:

Post a comment