तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 18 October 2019

चला मतदानाला जावूया.. राष्ट्रीय कर्तव्य बजावूया !.. . मतदानासाठी जिल्हा प्रशासन सज्ज


. 7 सखी, 7 आदर्श व एक ग मतदान केंद्र

. अंध मतदारांसाठी ब्रेल लिपीतून मतदान चिठ्यांचे वाटप

. 2263 मतदान केंद्र सज्ज

बुलडाणा, दि. 18 : महाराष्ट्र राज्यात विधानसभेसाठी  मतदान प्रक्रिया पार पडत असून जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघात दि.21 ऑक्टोबर रोजी  सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत आपल्याला मतदान करता येणार आहे. मतदान हे दान नसून आपलं कर्तव्य आणि नैतिक जबाबदारी समजून हा राष्ट्रीय पर्व यशस्वी करावा. मतदानाच्या माध्यमातून आपण आपली लोकशाही बळकट करीत असतो. भारतीय निवडणूक आयोगामार्फत घेतली जाणारी ही निवडणूक निर्भय, निःपक्ष, पारदर्शक आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने प्रशासनास दिले आहेत. जिल्ह्यात बुलडाणा, चिखली, मलकापूर, सिंदखेड राजा, खामगांव, मेहकर व जळगांव जामोद अशा सात विधानसभा मतदारसंघांचा समावेश असून जिल्हा प्रशासनाच्या वतीने तयारी पूर्ण झाली असून मतदारांनी  निर्भीडपणे, नि:संकोचपणे मतदानासाठी बाहेर पडावे आणि 100 टक्के मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ निरूपमा डांगे यांनी केले आहे.

     विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी जिल्ह्यात सात विधानसभा मतदारसंघनिहाय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. या सोबतच त्यांच्या मदतीला 7 सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी असणार आहेत. या निवडणूका पारदर्शक आणि सुरळीत पार पडाव्यात, यासाठी  12 हजार 617 मन्युषबळाची उपलब्ध असणार आहे. यामध्ये प्रिसाईडींग अधिकारी 2263, पोलींग स्टेशन अधिकारी 1 - 2263, पोलींग स्टेशन अधिकारी 2- 2263, पोलींग स्टेशन अधिकारी 3 - 2263, महिला बहुसंख्य मतदान केंद्र महिला अधिकारी 653 आणि 904 राखीव कर्मचारी असणार आहेत. तसेच पोलींग पार्टीमध्ये 9956 पुरूष व 653 महिला मनुष्यबळ असणार आहे. त्याचप्रमाणे निवडणूका शांततेत पार पडण्यासाठी  114 पोलीस अधिकारी, 2104 पोलीस कॉन्स्टेबल, 1544 होमगार्ड, एसआरपीएफ व सीपीएमएफ च्या 21 प्लाटून तैनात असणार आहे.   जिल्ह्यात 20 लक्ष 39 हजार 435 मतदारांची  नोंद असून जास्तीत जास्त मतदार मतदानाचा हक्क बजावतील, यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्वोतोपरी प्रयत्न केले आहेत.

  जिल्ह्यात एकूण 2 हजार 63 मतदान केंद्रांमार्फत ही निवडणूक मतदान प्रक्रिया पार पाडली जाईल.  दिव्यांग मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी प्रत्येक मतदारसंघात एक दिव्यांग विशेष मतदान केंद्र (सक्षम) असणार आहे. निवडणूक प्रक्रियेत सहभागी दिव्यांग कर्मचाऱ्यांमार्फत हे विशेष मतदान केंद्र चालविले जाणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर दिव्यांग मतदारांसाठी विशेष सोयी सुविधा पुरविल्या जाणार आहेत त्यांच्यासाठी शासकीय वाहनांची व्यवस्था देखील प्रशासनामार्फत करण्यात आली आहे. महिला मतदारांचा मतदान प्रक्रियेत जास्तीत जास्त सहभाग वाढावा, यासाठी प्रत्येक मतदारसंघात एक सखी मतदान केंद्र असणार आहे या केंद्रातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी या महिला असतील.

  अंध मतदार बांधवांना  ब्रेल लिपीतून मतदार चिठ्ठयांचे वाटप करण्यात येत आहे.  तसेच मतदान यंत्रामध्ये अंध मतदारांसाठी ब्रेल लिपीतील मतपत्रिका असणार आहे. जिल्ह्यात 7 आदर्श मतदान केंद्र असणार आहेत. मतदान केंद्रांवरील सर्व सुविधांची पुर्तता करण्यात आली आहे.

ही असणार सखी मतदान केंद्र : मलकापूर मतदारसंघात 202 वाकोडी, बुलडाणा मतदारसंघात 212 श्री शिवाजी विद्यालय बुलडाणा, चिखली मतदारसंघात 206 नगर परिषद मराठी प्राथमिक शाळा खोली क्रमांक 1 चिखली, सिंदखेड राजा मतदारसंघात 229 नगर परिषद उर्दू हायस्कूल, मेहकर मतदारसंघात 97 विवेकानंद नगर, खामगांमध्ये 172 एमजेपी खामगांव आणि जळगांव जामोद मतदारसंघात 58 शिवाजी विद्यालय जळगांव. आदर्श मतदान केंद्र : मलकापूर - 132 धानोरा, बुलडाणा - 188 भारत विद्यालय, चिखली - 190 नगर परिषद मराठी प्राथमिक शाळा पुंडलिक नगर चिखली, सिंदखेड राजा - 227 नगर परिषद कार्यालय सिंदखेड राजा, मेहकर - 125 डोणगांव, खामगांव - 123 जेव्ही मेहता स्कूल खामगांव आणि जळगांव जामोद - 130 ग्राम पंचायत इमारत आसलगांव. तसेच बुलडाणा मतदारसंघात 193 नगर परिषद शाळा बुलडाणा येथे दिव्यांग मतदारांसाठी विशेष मतदान केंद्र असणार आहे.                                                                     - - - - - - - - - - - -
तळहातावरील रेषाही बोलू लागल्या 'गो व्होट'

बुलडाणा, दि. 18 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीचा माहौल जोरात असून प्रशासनाच्यावतीने सर्वत्र गो व्होटचा जागर करण्यात येत आहे. नवनवीन क्लृप्त्या वापरून मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करीतआहे. विद्यार्थ्यांच्या प्रभातफेरी, दुचाकी रॅल

No comments:

Post a Comment