तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 11 October 2019

शेतावर,बांधावर जाऊन डॉ शिंदे घेताहेत शेतक-यांचा आशिर्वाद


प्रतिनिधी
पाथरी:-विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्यात प्रस्तापित नेत्यांना समाजिक कार्यकर्ते डॉ जगदीश शिंदे यांनी कडवे आव्हान उभे केले असून गोरगरीब,शेतकरी,कष्टकरी युवकांचा आशिर्वाद घेण्या साठी ते शेतातील सुगीचे दिवस असल्याने बांधावर,शेतावर आणि रस्त्यात भेटून आशिर्वाद घेतांना दिसत आहेत.
यावेळी त्यांच्या सोबत रावसाहेब निकम, राजेश मोरे, बालासाहेब टेकाळे,ज्ञानेश्वर थोरे, राजेश नवघरे या युवकांची उपस्थिती आहे. खरीपातील सोयाबीन काढणीला अाले असल्याने आणि रब्बीच्या पेरणीची धांदल गावा गावात असल्या मुळे उमेदवार हे मतदारांना भेटण्या साठी जात असतांना मिळेल तीथे भेटत आहेत. जगदीश शिंदे हा शेतकरी भुमीपूत्र असल्याने त्यांना दिवसें दिवस मतदारांचे वाढते पाठबळ मिळत असल्याचे पहावयास मिळत आहे. सकाळी आणि सायंकाळी गावात गेल्यास ढोलताशे लाऊन ग्रामस्थ,युवक, शेतकरी डॉ शिंदे यांचे वाजत गाजत मिरवणूक काढून प्रचार करत असल्याचे चित्र ग्रामिण भागात पहावयास मिळत आहे.

No comments:

Post a comment