तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 31 October 2019

भविष्य निर्वाह निधी कार्यालयाचा आदेश नसतानाही सुरू केली वैद्यनाथ कारखान्याची बदनामी ; विरोधकांचा पुन्हा खोटारडेपणा! पंकजाताई मुंडे आणि कारखान्याच्या बदनामीचे षडयंत्र!परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
       भविष्य निर्वाह निधीची रक्कम भरण्याबाबत संबंधित कार्यालयाने कोणतेही आदेश दिलेले नसताना विरोधकांनी पुन्हा खोटारडेपणाचा कळस गाठत वैद्यनाथ कारखान्याची बदनामी सुरू केली  आहे. साखर कारखानदारी अडचणीत असतानाही कारखान्याने कर्मचाऱ्यांची थकीत पगार एकरक्कमी दिल्याबद्दल कारखाना व्यवस्थापनाचे  कौतुक केले आहे. दरम्यान कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम भरण्याबाबत कारखान्याच्या अध्यक्षा पंकजाताई मुंडे या अनुकूल असुन ३० नोव्हेंबर पुर्वी रक्कम भरणार असल्याचे अगोदरच त्यांनी सांगितले आहे. असे असताना विरोधकांकडून पुन्हा  दिशाभूल करणा-या बातम्या पेरल्या जात असल्याबद्दल सर्वत्र  नाराजी होत आहे.

   वैद्यनाथ कारखाना कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम २४ तासांच्या आत कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा करावी असे आदेश भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने दिल्याचे सांगणारी खोटी बातमी विरोधकांच्या गोटातून प्रसिद्धीस देण्यात आली आहे.  वास्तविक ती बातमी पुर्णत: चुकीची आणि वैद्यनाथ कारखाना व अध्यक्षा पंकजाताई मुंडे यांची बदनामी करणारी आहे. भविष्य निर्वाह निधी कार्यालयात ३० आॅक्टोबर रोजी सुनावणी झाली. यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक जी. पी. एस. के. दिक्षीतुलू यांनी कारखान्याची भूमिका मांडली. गेल्या काही वर्षांपासून सतत दुष्काळ असल्याने सर्वच साखर कारखाने आर्थिक अडचणीत आहेत. वैद्यनाथच्या परिसरातील अनेक कारखान्यांच्या पगारी सहा ते आठ महिन्यांपासून झालेल्या नाहीत. असे असतानाही वैद्यनाथ साखर कारखान्याच्या अध्यक्षा पंकजाताई मुंडे यांनी कर्मचार्‍यांच्या थकीत पगार एकरक्कमी अदा केला आहे. भविष्य निर्वाह निधीची रक्कमही येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत भरणा करणार असल्याचे पुर्वीच सांगितले असल्याचे निदर्शनास आणून दिले. यावर भविष्य निर्वाह निधी कार्यालयाचे आयुक्त यांनी आर्थिक अडचण असुनही सर्व पगार अदा केल्याबद्दल कारखाना व्यवस्थापनाचे कौतुक करून तक्रारदारास समज दिली, याबाबत पुढील सुनावणी १४ नोव्हेंबर रोजी होणार असल्याचे सांगून संस्थेला रक्कम भरण्यासाठी वेळ द्यावी असेही ते म्हणाले, मात्र कारखान्याचे कार्यकारी संचालक यांनी आम्ही तातडीने काही रक्कम भरणा करणार सर्व रक्कम ही ३० नोव्हेंबरपर्यंत भरणा करणार असल्याचे सांगितले आहे. 
       पंकजाताई मुंडे यांनी कर्मचाऱ्यांना एकरक्कमी पगार दिल्याने सर्वांची दिवाळी आनंदात गेली असतानाही केवळ बदनामीसाठी चुकीच्या बातम्या दिल्या जात आहेत.

No comments:

Post a comment