तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 19 October 2019

धनंजय मुंडे यांचा तोल ढासळला ; संस्काराच्या सर्व मर्यादाही ओलांडल्या ; पंकजाताई मुंडे यांच्यावर गलिच्छ आणि बिभत्स भाषेत टिका ; सर्व सामान्य नागरिकांत संतापलेपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  राजकारणाचीच शिसारी होऊन ऊलट्या व्हाव्या असा प्रकार काल घडला. पराभव समोर दिसू लागल्याने राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी संस्काराच्या सर्व मर्यादा पार करत भाजपा महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्यावर अतिशय बिभत्स आणि गलिच्छ भाषेत टीका केल्याने मुंडे समर्थक, वंजारी समाज आणि सर्व सामान्य नागरिकांत संतापाची लाट पसरली आहे. 

   शरद पवार यांची काल विडा येथे जाहीर सभा झाली, या सभेत पवार आणि उपस्थितांची वाहवा मिळविण्यासाठी आपण काय बोलत आहोत याचे भान धनंजय मुंडे यांना राहिले नाही. भाजप महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्यावर अतिशय गलिच्छ प्रकारे बिभत्स हातवारे करुन टिका करताना धनंजय मुंडेची जीभ किती घसरली ? याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.  पंकजाताई मुंडे यांची संपूर्ण राज्यात व मतदारसंघात असलेली स्वच्छ आणि निष्कलंक प्रतिमा धनंजय मुंडे साठी खूप त्रासदायक ठरली आहे, लोकनेते मुंडे साहेबांची पुण्याई त्यांच्या पाठीशी असल्याने सर्व सामान्य माणसाला त्यांचे नेतृत्व हवे आहे. एकीकडे निवडणूकीत त्यांचे पारडे दिवसेंदिवस जड होत असताना दुसरीकडे धनंजय मुंडे यांच्या पायाखालची जमीनच सरकत चालली आहे, त्यामुळे अशा घाणरेड्या पद्धतीचा त्यांनी अवलंब केला आहे. व्हायरल व्हिडिओ मध्ये पंकजाताई यांच्यावर टिका करताना त्यांनी जी भाषा वापरली आणि हातवारे केले ते प्रचंड चीड आणणारे आहे. लोकनेते मुंडे साहेबांवरील जहरी टिकेपेक्षाही या टीकेने भावना अधिक दुखावल्या.  एका सुसंस्कृत राजकीय कुटूंबातील महिलेच्या बाबतीत त्यांनी वापरलेल्या भाषेवरून त्यांचा राजकीय -हास जवळ आल्याचे दिसून येते. रक्ताच्या बहीणीचं चारीत्र्यहनन करणारा हा व्यक्ती कुणाचा मुलगा,भाऊ ,पुतण्या होऊ शकलेला नाही, तुमचा आमचा काय होणार? अशा संतापजनक प्रतिक्रिया सर्व सामान्य जनतेत व्यक्त होत आहेत.

No comments:

Post a comment