तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 26 October 2019

राष्ट्रीय पातळीवरील 'युवा संशोधक' पुरस्काराने 'अभिजीत मुळे' सन्मानित
सुभाष मुळे..
----------------
गेवराई, दि. २६ _ येथील अभि
जीत भिमराव मुळे यांना राष्ट्रीय पातळीवरील 'युवा संशोधक' या पुरस्काराने अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले आहे. गेवराईसह संबंध बीड जिल्ह्याचा हा सन्मान असून सर्वांसाठी ही अभिमानास्पद बाब ठरली आहे.
        पुणे येथील जैविकतंत्रज्ञान वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट चे शास्त्रज्ञ डॉ. सुनिल दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली अभिजित मुळे यांनी सदर संशोधन केले आहे. सदर संशोधन मध्ये अभिजित याने जैव संप्रेरके बनवली आहेत, या जैवसंप्रेरकाच्या वापराने झाडांंची व पिकांंची वाढ होते व यांचा उपयोग सध्या जैविक शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर होत आहे. यांच्या वापराने रासायनिक खतांच्या व किटकनाशकांंच्या प्रमाणात प्रचंड घट होत असल्याचे आढळून आले आहे. तसेच याची फवारणी योग्य वेळी केल्यास पिकांंची वाढ कमी पाण्यात देखिल होत असल्याचे दिसून आले आहे. अभिजित मुळे यांच्या या कामाचे राष्ट्रीय पातळीवरील विज्ञान, तंत्रज्ञान व संशोधन या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या संशोधकांनी कौतुक केले आहे. अभिजीत मुळे हे गेवराई येथील ॲड. भिमराव काशिनाथराव मुळे यांचे ज्येष्ठ चिरंजीव आहेत. 'मार्शल अवार्ड फॉर स्टूडेंट्स' असे या पुरस्काराचे महत्त्वकांक्षी सुवर्ण नाव असून त्यांना "ॲग्रीकल्चर ॲण्ड एन्जॉयमाँलाँजी" या क्षेत्रातील प्रेक्षणिय व अमुल्य संशोधनासाठी बहुमान हा आठव्या इंडियन कायटिन अँण्ड कायटोसन सिंपोजियम या राष्ट्रीय परिषदेत इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मुंबई या ठिकाणी अभिजीत मुळे यास हा बहुमान प्रदान करण्यात आला.
          अभिजित मुळे यांनी केलेलं हे काम दोन अंतरराष्ट्रीय ( Enter National ) संशोधनपत्रांंमध्ये देखिल प्रकाशित केलेले आहे. अभिजीत हा गेवराई येथील रहिवासी असून सध्या तो मुंबई येथील Ph.D., ICT याठिकाणी कार्यरत आहे. Ph.D. मध्ये केलेल्या संशोधनाचे काम देखिल त्याने विविध अंतरराष्ट्रीय संशोधन पत्रामध्ये प्रकाशित केले आहेत. खूप कमी वेळात त्याने एकूण पंधरा संशोधनपत्र ( Research Papers ) प्रकाशीत केले आहेत. ही बाब उल्लेखनीय असून गेवराईसह सबंध बीड जिल्ह्यासह त्यांच्या परिवारातील सर्व सदस्य व नातेवाईकांसाठी अभिमानास्पद ठरली आहे.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

No comments:

Post a comment