तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 11 October 2019

युवक,अबालवृद्ध, महिलांच्या प्रेमाणे भाराऊन गेलो-डॉ जगदीश शिंदे


प्रतिनिधी
पाथरी:-मत कीती मिळतील आणि निकाल काय असेल हे माहीत नाही पण इथल्या युवकांनी, आबालवृध्दांनी, महिलांनी जो प्रेमाचा वर्षाव केला तो भारावुन टाकणारा आहे. असे भावनिक प्रतिपादन देवेगाव येथील कॉर्नर सभेत बोलतांना डॉ जगदीश शिंदे यांनी व्यक्त केले.
या वेळी त्यांच्या सोबत रावसाहेब निकम,डॉ शेजूळ, पांडूरंग गलबे, आणि सहकारी उपस्थित होते पुढे बोलतांना ते म्हणाले की, प्रचारात आज मी जे काही अनुभवतोय ते शब्दात व्यक्त न करण्या सारखं हे सगळ आज होत आहे,माझ्यात हिंमत आहे तोपर्यंत चालत राहील-लढत राहील आणि ही रोज जुडत चाललेली,जागृत झालेली सामान्य जनताच माझी हींमत आहे.कधी तरी या मतदारसंघातच नाही तर संपुर्ण राज्यात एक दिवस युवा परीवर्तनाची नांदी येईल.असे सांगत मला आपण केलेलं मत नक्कीच तुम्हाला स्वत:ला अभिमान वाटेल अशीच माझी पुढील पाच वर्षाची कारकिर्द असेल असे ही ते या वेळी बोलतांना म्हणाले. या वेळी देवेगाव येथील ग्रामस्थ, महिला,युवक मोठ्या संखेने उपस्थित होते.

No comments:

Post a comment