तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 18 October 2019

सर्व सामान्यांच्या तोंडी गुट्टे याचे नाव गंगाखेड मातदार संघात


अरुणा शर्मा

पालम :- पालम, पूर्णा व गंगाखेड  मतदार संघातील तालुक्यामध्ये गावागावात सर्वसामान्यांच्या तोंडी रासपचे उमेदवार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या नावाची चर्चा ऐकावयास मिळत आहे त्यावरून मतदारांचा त्यांना प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र समोर आले आहे
गंगाखेड मतदार संघामध्ये शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक उन्नती व्हावी असा उद्देश समोर ठेवून गंगाखेड शुगरची निर्मिती आकरा वर्षाखाली डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी केली होती त्यांनी गंगाखेड शुगरच्या माध्यमातून मोठमोठे प्रश्न मार्गी लावले आहेत गंगाखेड ते धारखेड पुलासारखा प्रश्न गेल्या 60 वर्षापासून रखडला होता त्यांनी तो मार्गी लावला यावर न थांबता डोंगरपट्टा व गोदाघाटावरील जनतेचा मतदारसंघाचा विकास करणारच असा उद्देश समोर ठेवून त्यांनी जलसंधारणाची कामे केली याबरोबर दुष्काळात ते शेतकऱ्यांच्या खंबीरपणे पाठिशी उभे राहिले. रत्नाकर गुट्टे यांनी शेतकऱ्यांच्या ऊसाला प्राधान्य देऊन व तात्काळ् गाळप करून त्याचे पैसे त्यांच्या खात्यात जमा केले असे विकासपुरूष असलेल्या डॉ.गुट्टे यांच्या पाठीमागे आता गंगाखेड मतदार संघातील सर्व जनता दिसून येत आहे गुट्टे यांच्या प्रचारार्थ रासपचे युवा प्रदेशाध्यक्ष राजेभाऊ फड, किसनराव भोसले, राजाभाऊ सतापुते, संदीप पाटील, ताहेर पठाण, वैजनाथ शिदे, राजेभाऊ कदम, संभाजी पोले, राम लटके, सुनिल भाऊ मुंडे, चॉद भाई, लक्ष्मण मुंडे, सत्यपाल साळवे, हनुमंत मुंडे,
राजेश फड, सजय काळे, राधाकृष्ण शिदे, भास्कर ठावरे, हनुमंत मुंडे, अविनाश बर्व, नारायण शेडगे, नितीन बडे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a comment