तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 9 October 2019

ना. पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ परळीत आज मातंग समाजाचा भव्य मेळावा; अण्णाभाऊ साठे महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, खा. डॉ. प्रितमताई मुंडेंची उपस्थितीपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि. 8...
        भाजपा - शिवसेना - रिपाई - रासप - रयत क्रांती सेना महायुतीच्या परळी विधान सभेच्या उमेदवार, राज्याच्या ग्राम विकास आणि महिला व बालकल्याण मंत्री तथा बीडच्या पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ परळीत उद्या बुधवारी मातंग समाजाचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मेळाव्याला ना. पंकजाताई मुंडे, अण्णाभाऊ साठे महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. 

   बुधवार दि. 9 आॅक्टोबर रोजी दुपारी 12:30 वाजता शिवाजी चौकातील अक्षदा मंगल कार्यालयात हा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मेळाव्याला जेष्ठ नेते प्रा. टी.पी. मुंडे, भाजपाचे प्रदेश चिटणीस राजेश देशमुख, तालुकाध्यक्ष शिवाजी गुट्टे, शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष सुधाकर पौळ, सुरेश माने, सतीश मुंडे, वैजनाथ जगतकर, प्रा. दासू वाघमारे आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. या मेळाव्याला मातंग समाजाच्या नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जितेंद्र मस्के, विक्रम मिसाळ, बबन कसबे, सुनील मस्के, अभिमान मस्के, मुरलीधर पारवे व संयोजकांनी केले आहे.

No comments:

Post a Comment