तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 19 October 2019

मतदान म्हणजे देशसेवेची एक संधी मतदान करा आणि लोकशाही बळकट करा


बाळू राऊत प्रतिनिधी 
मतदार हा राजा आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदारांनी निवडणूकीत मतदानाचा पवित्र हक्क बजावला पाहिजे आणि तो ही अगदी नि:पक्षपातीपणे. मात्र बऱ्याचदा असे होतांना दिसत नाही.
आपल्या अवतीभवती राहणारे अनेक लोक देशसेवेची कामे करत असतात. कुणी सैन्यात भरती होऊन देशाचे संरक्षण करून देशाची सेवा करतात, तर उद्योजक हा सुध्दा सुशिक्षीतांना रोजगार देऊन तसेच देशाचा आर्थिक विकास करत असतांना सुध्दा एक प्रकारे देश सेवाच करत असतो. संशोधक, शास्त्रज्ञ, शिक्षक, शेतकरी असे कितीतरी उदाहरणे आपण याप्रसंगी समोर ठेवु शकतो. त्याचप्रमाणे मतदान करणे हा सुध्दा एक देशसेवेचाच भाग आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी व सक्षम बनविण्यासाठी मतदान करणे खुप महत्वाचे आहे. त्यामुळे देशाच्या विकासाला गती मिळते. हा हेतू समोर ठेऊन देशाच्या प्रत्येक नागरिकाने मतदानाचा हक्क बजावला पाहिजे.
बऱ्याच वेळा आपण असा विचार करतो की, आपण एकट्याने मतदान न केल्याने काय फरक पडणार आहे. मतदान करुन तरी कुठे आपला विकास होणार आहे. पण एका एका मताने सुध्दा येथे खुप फरक पडतो. थेंबे-थेंबे तळे साचे या म्हणीप्रमाणे आपण फुल नव्हे फुलाची पाकळी समजुन एवढी तरी देशसेवा करुच शकतो.
निवडणुकीचे चित्र सध्या खुपच विचित्र स्वरुप घेत असुन. अतिशय खालच्या थराला जाऊन विरोधकांवर चिखलफेक करुन आपलीच बाजु रेटण्याचा प्रयत्न बऱ्याचदा होतांना दिसुन येतो. मात्र आपण एक मतदार म्हणुन चिकीत्सक वृत्तीने योग्य तो निर्णय घेऊन योग्य तो व्यक्ती निवडुण देऊ शकतो. यात सुध्दा मतदारांना वेगवेगळी आमीषे दाखवुन त्यांची मते मिळविण्याचा, वेळप्रसंगी मत विकत घेण्याचे प्रसंग वाढलेले आहेत. मात्र कोणत्याही आमिषाला बळी न पडता लोकशाहीने दिलेला मतदानाचा अधिकार हेच आपल्यासाठी शस्त्र आहे. याचा योग्य वापर केल्यास नक्कीच ही परिस्थिती सुधारण्यास मदत होईल.
आता राज्यभरात विधानसभा निवडणुकीचे वातावरण असुन मतदारांनी निवडणुकीमध्ये आपल्या मतदानाचा हक्क योग्यरितीने बजावुन एक शक्तीशाली राष्ट्र घडविण्यासाठी आपले एक मतदान खुप महत्वाचे आहे. आपण मतदानाचा हक्क बजावुन नक्की देशाच्या प्रगतीसाठी, उन्नतीसाठी सहकार्य कराल एवढीच अपेक्षा.
निवडणुकीच्या मतदानासाठी मतदान केंद्रावर ओळख पटविण्यासाठी आवश्यक ओळखपत्रांची यादी जाहीर ११ पैकी कोणताही एक पुरावा ओळखीसाठी ग्राह्य
सोमवारी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी मतदान केंद्रावर ओळख पटविण्यासाठी आवश्यक ओळखपत्रांची यादी भारत निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. निवडणूक आयोगाचे मतदार ओळखपत्र (EPIC) नसल्यास 11 पैकी कोणताही एक पुरावा ओळख पटविण्यासाठी ग्राह्य धरण्यात येईल.
          मतदाराची ओळख पटविण्यासाठी पर्यायी 11 पुरावे :  पारपत्र (पासपोर्ट), वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसेन्स), राज्य/केंद्र शासन, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपन्यांचे कर्मचारी असल्यास छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र, छायाचित्र असलेले बँकांचे/टपाल कार्यालयाचे पासबुक, पॅनकार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (नॅशनल पॉप्युलेशन रजिस्ट्रेशन) अंतर्गत महसूल निर्मिती निर्देशांक (रेव्हेन्यू जनरेशन इंडेक्स) द्वारे दिलेले स्मार्टकार्ड, मनरेगा जॉबकार्ड, कामगार मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा स्मार्टकार्ड, छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तावेज (पीपीओ), खासदार,आमदार, विधानपरिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र, आधारकार्ड यापैकी कोणत्याही एक पुरावा मतदान केंद्रावर घेऊन जाणे आवश्यक आहे.

No comments:

Post a Comment