तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 26 October 2019

परळी तालुक्यातील कासारवाडीचा 'बोरणा' तलाव १०० टक्के भरला ; वाण मध्ये ओघ सुरू! जलसाठे भरत असल्याने समाधानाचे वातावरण


परळी वैजनाथ  (प्रतिनिधी) :- 
        पर

तालुक्यातील  कासारवाडी येथील 'बोरणा' मध्यम प्रकल्प  १०० टक्के  भरला आहे. तालुक्यातील जलसाठे भरत अअसल्याने समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. परळी चा मुख्य जलस्त्रोत असलेल्या नागापूर येथील वाण प्रकल्पात पाण्याचा मोठा ओघ सुरू झाला आहे. 
         परळी तालुक्यात चांगला  पाऊस सुरू  झाला आहे. त्यामुळे सर्वत्र पाणी साठवण होण्यासाठी मोठी मदत होणार आहे. परळी तालुक्याचा मुख्य जलस्त्रोत नागापूर येथील  'वाण प्रकल्प' पूर्ण क्षमतेने भरणे आवश्यक आहे कारण  परळी शहराला याच प्रकल्पातून पाणीपुरवठा होतो. तसेच तालुक्यातील बहुतांश सिंचनाखाली येणारा भाग ही या धरणावर आवलंबून आहे. तालुक्यातील बोधेगाव, करेवाडी, चांदापुर, कन्हेरवाडी, गुट्टेवाडी, मोहा, मालेवाडी, गोपाळपुर, खोडवा सावरगाव, दैठणाघाट, करेवाडी आदींमध्ये हळुहळु पाणी साठवण होण्यास  सुरुवात झाली आहे. 

बोरणा तलावाच्या सांडव्यावरुन पाणी प्रवाहित ....
        दरम्यान परळी पासून जवळच असलेल्या कासारवाडी येथील बोरणा तलावात 100 टक्के  पाणीसाठा झाला  आहे. मध्यम प्रकल्प असलेल्या बोरणा प्रकल्पाची प्रकल्पिय पाणीसाठा क्षमता 10. 814 द. ल. घ. मी. एवढी आहे. मृतसाठा 1.842 द. ल. घ. मी. इतका असून सद्यस्थितीत बोरणा प्रकल्पात सांडव्यावरुन पाणी प्रवाहित झाले आहे.
       तालुक्यातील नागापुर वाण, बोधेगाव, करेवाडी , कन्हेरवाडी, मालेवाडी , तांदुळवाडी ,मोहा ,चांदापुर ,गुट्टेवाडी,खोडवा सावरगाव, दैठणाघाट आदींसह  पाझर तलाव, साठवण तलाव, शेततळे, लघु व मध्यम प्रकल्प, बंधारे, नद्या, ओढे, विहिरी पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता सध्याच्या पावसामुळे दिसुन येत आहे.जलसाठे भरण्याच्या स्थितीत असल्याने समाधानकारक परिस्थिती निर्माण झाली आहे. 
  

No comments:

Post a comment