तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 10 October 2019

मनीवाइज सेंटर चा द्विवर्षीय कार्यपूर्ती सोहळा संपन्न                                                                                             
 रिसोड :- महेंद्रकुमार महाजन 

 रिसोड - भारतीय रिझर्व बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया,नाबार्ड व क्रिसिल फाउंडेशन च्या सहकार्याने  दि 10 ऑक्टोबर २०१७ रोजी मनिवाइज-वित्तीय साक्षरता केंद्रचा व्दीवर्षीय कार्यपुर्ती सोहळा संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाला भारतीय स्टेट बँक रिसोड शाखेचे क्षेत्र अधिकारी अतुल देबाजे,अकोला मध्यवर्ती बँक चे सचिन सर नगरपरिषद चे पट्टेबहादूर सर,बँक मित्र गजानन खंदारे तालुका समन्वयक राजेंद्र पडघान,
क्षेत्र समन्वयक किशोर चक्रनारायण,संघपाल वाघमारे मनीवाइज तालुका समिती अध्यक्ष विष्णू जाधव उपाध्यक्ष सुनीता गंगावणे यांची उपस्थिती होती. 
               यावेळी उपस्थित अतुल देबाजे यांनी वित्तीय साक्षरतेचे खऱ्या अर्थाने कार्य वाशिम जिल्हा मध्ये मनिवाइज सेन्टर च्या माध्यमातून होत आहे,लोकांना बचत खात्याचे महत्व कळत आहे, तसेच पट्टेबहादूर यांनी तळागळातील लोकांसाठी मनिवाइज पोहचून लोकांना वित्तीय ज्ञान देऊन लोकांमध्ये दीर्घकालीन आर्थिक ता जागृतीचे कार्य या वित्तीय चळवळीतून होत आहे असे मनोगत व्यक्त केले तसेच उपस्थित मान्यवरांनी सुद्धा यावेळी मनिवाइज च्या कार्याबद्दल प्रशंसनीय उदगार काढून मनोगत व्यक्त केले.
             सदर कार्यक्रमाचे संचालन संघपाल वाघमारे यांनी केले प्रास्ताविक राजेंद्र पडघान यांनी केले.यावेळी सुदाम जुमडे ग्रामीण वित्तीय सल्लागार संदीप सरकटे,बाजड,लता जाधव,समाधान वानखळे,साधना शेजुळ आदी मान्यवरांची उपस्थिती होते ,उपस्थित मान्यवरांचे आभार किशोर   
चक्रनारायण यांनी मानले.

महेंद्रकुमार महाजन जैन रिसोड 
प्रतिनिधी 
9960292121
9420352121

No comments:

Post a Comment