तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 6 October 2019

श्री साईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी येथे सोमवारपासून विजयादशमी उत्सव.


प्रतिनिधी
पाथरी:-येथील श्री साईबाबा जन्मस्थान मंदिरात श्री साई स्मारक समिती पाथरी च्या वतीने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी दिनांक ७ ऑक्टोबर ते दिनांक १० ऑक्टोबर या कालावधीत विजयादशमी उत्सव साजरा होत असल्याची माहिती समितीचे कार्यकारी विश्वस्त श्री अॅड. अतुलराव चौधरी यांनी दिली.
येणारा दसरा उत्सव हा श्रीसाईबाबांची १०१ वी पुण्यतिथी असून श्री साईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी येथे हा वीस वर्षापासून साजरा केला जातो. प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी दसरा उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असून उस्तवात होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा पुढील प्रमाणे आहे. 

प्रारंभ दिवस सोमवार दि.०७/१०/२०१९ अश्विन शु. ९ शके १९४१
पहाटे     ०५:००     शहनाई 
पहाटे     ०५:१५    श्री साईबाबांची काकड आरती
सकाळी  ०६:००    श्री साईबाबांच्या प्रतिमेची व श्री साई सच्चरित ग्रंथाची, मंदिर ते द्वारकामाई, मिरवणूक व   द्वारकामाईत अखंड पारायण प्रारंभ.    
सकाळी   ०७:१५    श्रींचे मंगल स्नान व दर्शन
सकाळी   ०८:३०    अभिषेक, पूजा व आरती (शिर्डी माझे पंढरपूर), विष्णुसहस्त्रनाम स्तोत्राचे सामुदायिक पठण
दुपारी     १२:००    माध्यान्ह आरती व महाप्रसाद
दुपारी    ०३:३०     कीर्तन
सायं      ०६:००    रामरक्षा व हनुमान स्तोत्र -  धुपारती, धुपारती नंतर गुरुवारचे नेहमी प्रमाणे पालखी मिरवणूक   व हरिपाठ 
रात्रौ.      ०८:००    भजन संध्या, श्री ओंकार संसारे,  रत्नागिरी
रात्रौ.      ०९:००    शेजारती
मुख्य दिवस मंगळवार दि.०८/१०/२०१९ अश्विन शु. १० शके १९४१
पहाटे     ०५:००     शहनाई 
पहाटे     ०५:१५    श्री साईबाबांची काकड आरती
पहाटे    ०५:३०     प.पू. श्री साईबाबांचे कुलदैवत पंचबावाडी हनुमान मंदिर, माळीवाडा येथे अभिषेक
सकाळी  ०६:००    अखंड पारायण समाप्ती व श्री साईबाबांच्या प्रतिमेची व श्री साई सच्चरित ग्रंथाची द्वारकामाई ते मंदिर 
                        मिरवणूक
सकाळी   ०७:१५    श्रींचे मंगल स्नान व दर्शन
सकाळी   ०८:३०    अभिषेक, पूजा व आरती (शिर्डी माझे पंढरपूर), विष्णुसहस्त्रनाम स्तोत्राचे धुनी व
                        सामुदायिक   पठण,   रथ पूजा, कोरडी भिक्षा झोळी कार्यक्रम
सकाळी   १०:००   कीर्तन
दुपारी     १२:००   माध्यान्ह आरती व महाप्रसाद
दुपारी    ० ४:३०    श्री साईबाबांच्या रथाची भव्य मिरवणूक, सिमोलंघन, हरिपाठ व नंतर धुपारती 
रात्रौ.      ०८:००    भजन संध्या, श्री ओंकार संसारे,  रत्नागिरी
रात्रौ.      ०९:००    शेजारती
तिसरा दिवस बुधवार, दि./०९/२०१९ अश्विन शु. ११ शके १९४१
पहाटे     ०५:००     शहनाई
पहाटे     ०५:१५    श्री साईबाबांची काकड आरती
सकाळी   ०७:१५    श्रींचे मंगल स्नान व दर्शन
सकाळी   ०८:३०    अभिषेक, पूजा व आरती (शिर्डी माझे पंढरपूर), विष्णुसहस्त्रनाम स्तोत्राचे सामुदायिक पठण
सकाळी    १०:००   कीर्तन
दुपारी     १२:००    माध्यान्ह आरती व महाप्रसाद
सायं      ०६:००    रामरक्षा व हनुमान स्तोत्र -  धुपारती नंतर हरिपाठ
रात्रौ.      ०८:००    सेवेकऱ्यांचा भक्तिगीतांचा कार्यक्रम
रात्रौ.      ०९:००    शेजारती
सांगता दिवस गुरुवार, दि. १०/१०/२०१९ अश्विन शु.१२ शके १९४१
पहाटे     ०५:००     शहनाई
पहाटे     ०५:१५    श्री साईबाबांची काकड आरती
सकाळी   ०७:१५    श्रींचे मंगल स्नान व दर्शन
सकाळी   ०८:३०    अभिषेक, पूजा व आरती (शिर्डी माझे पंढरपूर), विष्णुसहस्त्रनाम स्तोत्राचे सामुदायिक पठण
सकाळी   १०:००    काल्याचे कीर्तन
दुपारी     १२:००    माध्यान्ह आरती व महाप्रसाद
सायं      ०६:००    रामरक्षा व हनुमान स्तोत्र -  धुपारती नंतर गुरुवारची पालखी व हरिपाठ
रात्रौ.      ०९:००    शेजारती
ज्या साईभक्तांना पारायणात सहभागी होण्याची इच्छा आहे त्यांनी आपली नाव नोंदणी दिनांक ०६ ऑक्टोबर पूर्वी श्री प्रताप आम्ले (मो.९२०९०३६००८) यांचे कार्यालयात सकाळी १०:०० ते सायं.०७:०० या वेळेत किंवा सोबत च्या नंबरवर कॉल करून नाव नोंदणी करावी. अशी श्री अॅड.अतुलराव चौधरी यांनी माहिती दिली.

No comments:

Post a comment