तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 22 October 2019

एस टी चालकाची मनमानी....'प्रवाशाच्या सेवेसाठी' ब्रिद फक्त नावालाच

फुलचंद भगत
वाशिम-प्रवाशाच्या सेवेसाठी हे महामंडळचे ब्रिद फक्त नावालाच ऊरले असुन एसटी महामंडळ चालकांच्या मनमानी आणी मुजोरीमुळे प्रवाशांना नाहक ञास सहन करायचे काम पडत असल्याने प्रवाशी एसटीच्या प्रवासावर अनास्था दाखवत असुन खाजगी वाननाने प्रवास करन्याकडे प्रवाशांचा कल वाढला आहे.
        एकीकडे एस टी महामंडळला पाहीजे तसे  ऊत्पन्न मिळत नसल्याची ओरड महामंडळकडून होत आहे.एस टी मध्ये प्रवाशाच्या सेवेसाठी विविध बदल करून दर्जेदार सुविधा देन्याकडे परिवहन विभागाचा कल दिसतो परंतु 'घर का भेदी,लंका ढाये' या म्हणीप्रमाणे हे एसटी महामंडळचे काही मुजोर आणी मनमानि करणारे चालकही जबाबदार असल्याचे प्रवाशामध्ये बोलल्या जाते.दि.२२ आॅक्टोबर सकाळी ८ वाजताच्या दिग्रस अकोला गाडी चालकाने मंगरूळपीर बस स्टन्डजवळच असुन अकोला जाणेकरीता एका प्रवाशाने एसटीला हात दाखवला परंतु मुजोर एसटी चालकाने गाडी न थांबवता जोरात दामटली.गाडीमध्ये बहूतांश सिटा रिकाम्याच होत्या आणी ती गाडी नुकतीच मंगरूळपीर डेपोतुन निघुन रस्त्यावर आली होती.सदर गाडी ही दिग्रस डेपोची होती.यासंदर्भात तात्काळ मंगरूळपीर आगार प्रमुखाशी संपर्क करुन तक्रार केली असता हा प्रकार गंभीर असल्याचे सांगुन प्रवाशांसाठी गाडी न थांबवणार्‍या मुजोर चालकाविषयी माहीती घेवून योग्य ती कारवाई करन्याचे आश्वासन दिले.ज्या प्रवाशासाठी गाडी थांबवली नाही ते आजारी होते आणी ऊपचारासाठी अकोला चालले होते.त्यानंतर दुसरी गाडी लागेपर्यत ताटकळत मंगरुळपीर बस स्टन्डवर थांबावे लागल्याने एसटी महामंडळविषयी तिव्र नाराजी व्यक्त केली.अशाप्रकारे आजारी अपंग अथवा ज्यांना अर्जट पोहचायचे असते अशा प्रवाशांना नाहक ञास होत असल्याने खाजगी वाहनाने प्रवास करन्याकडे प्रवाशांचा कल वाढलेला दिसुन येत आहे.बहूतांश वेळी चौकामध्ये आणी बस थांब्यावर चालक बस थांबवत नाहीत.प्रवाशी गाडीमागे पळत एस टी थांबवन्याची विनंती करतात परंतु काही मुजोर चालक आपल्या मनमानीपणाने दुसरी रिकामी गाडी मागेच आहे असे कारण सांगुन गाडी थांबवत नाहीत.असे प्रकार गंभीर असुन परिवहण मंञ्यांनी अशा एस टी कर्मचारांना धडा शिकवावा आणी सबंधीत आगारप्रमुखानेही अशांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.दिग्रस डेपोच्या मंगळवार दि.२२ आॅक्टोबर च्या सकाळी ८ वाजताच्या मंगरूळपीर डेपोतुन सूटणार्‍या गाडी चालकांची माहीती घेवून सबंधितावर कारवाई करावी अशी मागणी आगार प्रमुखाकडे केली असून यावर आगार प्रमुख कीती गांभीर्याने घेतात व सबंधित एस टी चालकावर खरच कारवाई करतात का हे  महत्वाचे असुन यासंदर्भात परिवहन मंञ्याकडे व सबंधित आगारात लेखी तक्रार करणार असल्याचेही तक्रारकर्त्यांनी सांगीतले.

फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.8459273206,9763007835

No comments:

Post a Comment