तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 7 October 2019

पाथरीत चार उमेदवारांची माघार;जिल्‍हयात एकुण २८ उमेदवारांनी घेतली उमेदवारी मागे;५३ उमेदवार निवडणूकीच्‍या रिंगणात

  

 विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019

प्रतिनिधी
परभणी:- दि. ७ : पाथरी विधानसभा मतदार संघात चौदा पैकी चार उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले असल्याने दहा उमेदवार निवडणुक रिंगणात राहिले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेतलेल्यां मध्ये डॉ राम शिंदे, डॉ संजय कच्छवे, मुंजाभाऊ कोल्हे आणि भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष पी डी पाटील यांचा सामावेश आहे.
परभणी जिल्‍ह्यातील चार विधानसभा मतदारसंघातील एकुण ८१ उमेदवारांपैकी २८ उमेदवारांनी माघार घेतली असून ५३ उमेदवार निवडणूकीच्‍या रिंगणात आहेत.


यामध्‍ये ९५-जिंतूर- एकुण १७ उमेदवारांपैकी ४ उमेदवारांनी माघार घेतली असून १३ उमेदवार निवडणूक लढविणार आहेत.  ९६-परभणी – मतदारसंघातील एकुण २७ उमेदवारांपैकी १२ उमेदवारांनी माघार घेतली असून १५ उमेदवार निवडणूक लढविणार आहेत.    

९७-गंगाखेड- मतदारसंघातील एकुण २३ उमेदवारांपैकी ८ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले असून एकुण १५ उमेदवार निवडणूकलढविणार आहेत.  ९८- पाथरी- मतदारसंघातील एकुण १४ उमेदवारांपैकी ४ उमेदवारांनी माघार घेतली असून एकुण १० उमेदवार निवडणूक लढवणार आहेत.    जिल्‍ह्यातील ४ मतदारसंघात एकुण ८१ पैकी ५३ उमेदवार निवडणूकीच्‍या रिंगणात आहेत.

No comments:

Post a comment