तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 17 October 2019

कारगील शहीद मुंजाभाऊ तेलभरे यांचा स्मृतीदिन साजरासोनपेठ : येथील शहीद मुंजाभाऊ तेलभरे चौकामध्ये तालुक्यातील पिंपळगाव येथील कारगिल शहीद मुंजाभाऊ तेलभरे यांचा स्मृतिदिन गुरूवार दिनांक 17 ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात आला. 
कारगिल युद्धामध्ये मातृभूमीसाठी बलिदान देणारे तालुक्यातील थडी पिंपळगाव येथील मुंजाभाऊ तेलभरे हे या तालुक्याचे वैभव असून तालुक्याला त्यांचा मोठा अभिमान आहे. त्यांचा स्मृतिदिन हा त्यांच्या गावांमध्ये प्रेरणादायी दिवस म्हणून साजरा केला जातो. हाच दिवस शहरातील कै. शहीद मुंजाभाऊ तेलभरे चौकामध्ये साजरा करण्यात आला.
यावेळी शहिद मुंजाभाऊ तेलभरे यांचे वडिल मारोतराव तेलभरे, येथील माजी आमदार व्यंकटराव कदम, नगरसेवक अॅड. श्रीकांत विटेकर प्रा.डॉ.संतोष रणखांब, सुधीर बिंदू,मुख्याध्यापक डी.के.पवार,ग्रंथवाचन चळवळीचे राजेश्वर खेडकर, प्रा. डॉ. विठ्ठल जायभाये,गणेश पाटील, कृष्णा पिंगळे यांची उपस्थिती होती.
यावेळी प्रा. डॉ. संतोष रणखांब व ह.भ.प. विठ्ठल जायभाये यांनी आपले मनोगत व्यक्त करत प्रेरणादायी व्यक्तिमत्व होऊन गेलेल्या, तालुक्याला अभिमान असलेल्या व तालुक्याची खरी ओळख असणाऱ्या शहीद मुंजाभाऊ तेलभरे यांच्या जीवनावर प्रकाश टाकत हे शहीद खऱ्या अर्थाने समाजाचे नायक असतात हे सांगितलं.उपस्थितीत नागरिकांकडुन शहिद मुंजाभाऊ तेलभरे यांना आदरांजली वाहण्यात आली.
कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रास्ताविक व आभार श्रीहरी तेलभरे यांनी मानले यावेळी पिंपळगावचे ग्रामस्थ व पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

No comments:

Post a comment