तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 3 October 2019

ना. पंकजाताई मुंडे यांच्या ऐतिहासिक विजयी संकल्प रॅलीने राष्ट्रवादीचे धाबे दणाणले
भाजपा महायुतीच्या कार्यकर्त्यांचे परळीत जोरदार शक्तिप्रदर्शन ; प्रचंड उत्साह, जबरदस्त जल्लोष !
'कोण आली रे', कोण आली, महाराष्ट्राची वाघिण आली', घोषणेने शहर दुमदुमले!

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  दि. ०३---लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांचा विजय असो, पंकजाताई तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, 'कोण आली रे कोण आली, महाराष्ट्राची वाघिण आली' अशा गगनभेदी घोषणा, कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह व जबरदस्त जल्लोष अशा वातावरणात भाजपा महायुतीच्या उमेदवार तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांच्या ऐतिहासिक विजयी संकल्प रॅली आज शहरात निघाली. या रॅलीने सर्वत्र कमळाचीच हवा निर्माण झाल्याने राष्ट्रवादीचे धाबे चांगलेच दणाणले.

    भाजपा - शिवसेना - रिपाइं - रासप - रयत क्रांती सेना महायुतीच्या परळी विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार, राज्याच्या ग्राम विकास आणि महिला व बालकल्याण मंत्री तथा बीडच्या पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी गुरूवारी शुभ मुहूर्तावर आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्यासाठी ना. पंकजाताई मुंडे यशःश्री निवासस्थाना बाहेर येताच कार्यकर्त्यांनी   ढोलताशांच्या गजरात आणि घोषणांच्या जयघोषात त्यांचे स्वागत केले. त्यांनी थेट गणपती मंदिर, वैद्यनाथ मंदिर आणि नंतर गोपीनाथ गडावर जाऊन लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांचे शिवाजी चौकात आगमन झाले. येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांच्या ऐतिहासिक विजयी संकल्प रॅलीला सुरवात झाली. रॅलीतील त्यांच्या वाहनाला भाजपसोबत मित्रपक्षांचे भगवे, निळे, पिवळे झेंडे लावण्यात आले होते. प्रत्येकांच्या हातात भाजपचा झेंडा, टोपी व गळ्यात रूमाल सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. यावेळी त्यांच्या विजयाच्या जोरदार घोषणांनी परिसर अगदी दणाणून गेला होता. ढोल ताशांच्या निनादात व फटाक्यांच्या आतिषबाजीत वाजत गाजत  ही रॅली मार्गस्थ झाली. साठे चौकात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे तसेच रेल्वे स्टेशन परिसरात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास ना. पंकजाताई मुंडे यांनी पुष्पहार अर्पण केला. यानंतर रॅली एकमिनार चौक, स्टेशन रोड, मार्केट कमिटी, मोंढा, टाॅवर, गणेशपार, नांदुरवेस, नेहरू चौक (तळ) मार्गे राणी लक्ष्मीबाई टाॅवर चौकात आली व याठिकाणी रॅलीचे रूपांतर जाहीर सभेत झाले.  या रॅलीत राज्याचे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, खासदार डाॅ प्रितमताई मुंडे, यशःश्रीताई मुंडे, केशवराव आंधळे,  वसंतराव नाईक महामंडळाचे उपाध्यक्ष देविदास राठोड, माजी आमदार गोविंदराव केंद्रे, फुलचंद कराड, भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सचिन मुळूक, राजेश देशमुख, शिवाजीराव गुट्टे, जुगलकिशोर लोहिया, नीळकंठ चाटे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख व्यंकटेश शिंदे, शहर प्रमुख राजेश विभूते आदींसह असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. 

बाळ पंकू  'विजयीभव'

मुल कितीही मोठे झाले तरी आईसाठी ते बाळच असते त्याचा प्रत्यय आला. ना. पंकजाताई मुंडे उमेदवारी दाखल करण्यासाठी निघाल्या तेंव्हा त्यांच्या मातोश्री प्रज्ञाताई मुंडे यांनी त्यांचे औक्षण केले तेंव्हा त्यांनी "बाळ पंकू विजयीभव" असा आशिर्वाद दिला. यावेळी त्यांच्या भावना आवरता आल्या नाहीत. काही काळ सगळेच स्तब्ध झाले होते. यावेळी खा. डॉ. प्रीतम गोपीनाथ मुंडे, यशश्री मुंडे यांनी औक्षण करून पेढा भरवला.  या प्रसंगी समवेत पंकजा मुंडे यांचे पती डॉ. अमित पालवे, खा. डॉ. प्रीतम मुंडे यांचे पती गौरव खाडे, मंत्री महादेव जानकर असा पूर्ण परिवार होता.

No comments:

Post a comment