तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 18 October 2019

आशावर्कर्स चे मानधन वाढवण्या साठी प्रयत्न करणार-डॉ जगदीश शिंदेप्रतिनिधी
पाथरी:- आशा वर्कर हा आरोग्य सेवेत ला एक अत्यंत महत्वाचा घटक असून सरकार दरबारी सर्वात दुर्लक्षित असा वर्ग आहे. या निवडनुकीत जिंकून आल्यावर आशा वर्कर्सला मानधन प्रति महिना किमान दहा हजार,किमान  निवृत्तीवेतन, टप्प्या टप्प्या ने सेवेत स्थायी करणे अशा प्रलंबित मागण्या शासन दरबारीं लावून मान्य करून घेण्याचे डॉ जगदीश शिंदे यांचे आशा वर्कर यांना शुक्रवार १८ ऑगष्ट राेजी आश्वासन दिले.
यावेळी त्यांच्या साेबत डॉ विक्रम पाटील,डॉ सचिन कदम, डॉ पवार,राजेा माेरे,रावसाहेब निकम यांची उपस्थिती हाेती. पुढे बाेलतांना डॉ शिंदे म्हणाले की मतदार संघा साठी ज्या काही चांगल्या गाेष्टी करता येतील त्या सर्वांचं व्यवस्थित नियाेजन करून जाणकारांचे सल्ले घेत प्रत्येक गावात जाऊन भेटी घेत चर्चा करूनच आपण पुढील कामकाज करणार आहाे. आज पर्यंत हे लाेक निवडणुकी पुरते जनतेत वावरतांना आपण पाहिले आहेत. निवडून आल्यास तीन,चार वर्ष यांचा जनतेशी कुठलाच संबंध नसताे अशा लाेकांना आता घरीच बसवण्याची वेळ आली आहे. मी तीनही शहरात संपर्क कार्यालय स्थापण करून जनता दरबारातबन जनतेचे प्रश्न मार्गीलावण्या साठी सतत प्रयत्न करणार आहे. लाेकसेवक काय असताे हे सर्वांना दाखऊन देणार. शेतक-यांचा  पाणी,विजेचा प्रश्न कायम स्वरूपी मार्गी लागल्या शिवाय मी स्वस्थ बसनार नसल्याचे सांगुन.मतदार संघातील अपंग, निराधार यांच्या मासिक मानधना साठी आपले प्राधान्य असेल असे ही ते या वेळी बाेलतांना म्हणाले. मतदार संघातील प्रत्येक बेराेजगार युवकांना मी राेजगार उपलब्ध करून देण्यास बांधिल राहील. युवकांच सहकार्य खुप महत्वाचं आहे सर्वजन काम करत आहेत तुमची संघटीत शक्तीच माझा विजयाचा मार्ग सुकर करत असल्याचे ही ते या वेळी बाेलतांना म्हणाले.

No comments:

Post a comment