तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 18 October 2019

ना. पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ आज टाॅवरला जाहीर सभा ; राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसेन येणार ; व्यापारी, नागरीकांना त्रास नको म्हणून रॅली न काढता सभा घेण्याचा ना. पंकजाताई मुंडे यांचा निर्णयपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  शहरातील व्यापारी, नागरीकांना त्रास नको म्हणून प्रचार रॅली न काढता थेट सभा घेऊन प्रचाराची सांगता करण्याचा निर्णय भाजपा महायुतीच्या उमेदवार ना. पंकजाताई मुंडे यांनी घेतला आहे. उद्या शनिवारी दुपारी होणाऱ्या सभेला भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते तथा माजी केंद्रीय मंत्री शाहनवाज हुसेन उपस्थित राहणार आहेत. सभेला नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महायुतीच्या वतीने करण्यात आले आहे.

   भाजपा - शिवसेना - रिपाइं - रासप - रयत क्रांती सेना महायुतीच्या उमेदवार ना. पंकजाताई मुंडे यांच्या प्रचाराची सांगता जाहीर सभेने होणार आहे. प्रत्येक वेळी काढली जाणारी प्रचार रॅली यावेळी काढण्यात येणार नाही. रॅलीमुळे व्यापारी, नागरीकांना त्रास होतो म्हणून रॅली न काढण्याचा निर्णय ना. पंकजाताई मुंडे यांनी घेतला आहे. प्रचाराची सांगता सभा शनिवार दिनांक 19 आॅक्टोबर रोजी दुपारी 2 वाजता राणी लक्ष्मीबाई टावर चौकात होणार आहे. या सभेला ना. पंकजाताई मुंडे, शहनवाज हुसेन, खा. डॉ. प्रितमताई मुंडे आणि महायुतीचे पदाधिकारी उपस्थित राहुन मार्गदर्शन करणार आहेत.
     या सभेला परळी वैजनाथ विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले आहे.

जिंतूरला एक तर जिल्हयात चार झंझावाती सभा

शनिवारी जाहीर प्रचाराचा समारोप होणार आहे. स्वतः उमेदवार असल्या तरी ना. पंकजाताई मुंडे या आपले स्टार प्रचारकाचे दायित्व निभावत असुन उद्याही त्यांच्या विविध ठिकाणी सभा होणार आहेत. शाहनवाज हुसेन हे देखील त्यांच्या समवेत असणार आहेत. सकाळी 8 वाजता कन्हेरवाडी येथे जाहीर सभा होणार आहे. सकाळी 9 वाजता जिंतूर येथे सभा आहे तर सकाळी 10.30 वाजता वडवणी येथे प्रचार सभा होणार आहे. सकाळी 11.30 वाजता मादळमोही तर 12.30 वाजता कडा येथे जाहीर सभा घेऊन ना. पंकजाताई मुंडे मार्गदर्शन करणार आहेत.

No comments:

Post a comment