तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 1 October 2019

काळे वस्ती चांदापूर येथील शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.01.......परळी तालुक्यातील काळे वस्ती, चांदापूर येथील भाजपचे चंद्रकांत काशिनाथ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली असंख्य कार्यकर्त्यांनी आज विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या संपर्क कार्यालयात गटनेते वाल्मिकअण्णा कराड यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

जगमित्र संपर्क कार्यालयात झालेल्या या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमात बालाजी काळे, काशिनाथ काळे, मारोती काळे, राम काळे, सचिन काळे, सोमनाथ काळे, लक्ष्मण काळे, अशोक काळे, सिधबा काळे, शिवाजी काळे, संतोष काळे, सखाराम काळे, शिवराज काळे, संदिप काळे, बळीराम काळे, सुभाष पवार, संतोष आंधळे, शाम गायकवाड, आदींसह असंख्य गावकर्‍यांनी प्रवेश केला. 

या गावकर्‍यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पारडे जड झाले आहे. विधानसभा निवडणूकीत धनंजय मुंडेंना गावातून मताधिक्य मिळवून देण्याचा निर्धार पक्षात प्रवेश केलेल्या गावकर्‍यांनी बोलून दाखवला.
यावेळी रा.काँ.चे तालुकाध्यक्ष लक्ष्मणराव पौळ, नंदागाळचे सरपंच बालाजी हनवते, नंदकुमार गित्ते, संग्राम गित्ते, श्रीहरी गित्ते, कल्याण गित्ते, शिवाजी मिसाळ,  रतन गित्ते आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment