तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 18 October 2019

धर्मापूरीतील मतदारांचा कल ना. पंकजाताई मुंडे यांच्या बाजूने; लेकीला एकजुटीने देणार मताधिक्य ; धर्मापुरीत मतदारांशी दिल्या घरोघरी भेटी


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि. १८ --- भाजप महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांनी काल धर्मापूरी येथे मतदारांच्या घरोघरी जाऊन भेटी घेतल्या. विकासाला प्राधान्य देणा-या लेकीला येथील मतदारांनी कौल देत पुन्हा एकजुटीने मताधिक्य देण्याचा निर्धार केला आहे. 
     गुरूवारी ना. पंकजाताई मुंडे यांनी धर्मापुरी गावांत जाऊन ठिकठिकाणी बैठका घेतल्या व मतदारांशी संवाद साधला. आपल्या भागाच्या सर्वांगिण विकासाला मला गती द्यायची आहे. सत्तेच्या माध्यमातून मी ग्रामीण भागाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला व विकासाला चालना दिली आहे. धर्मापुरी येथे भव्य रूग्णालय उभारून रूग्णांची मोठी सोय केली आहे. केदारेश्वर मंदिराच्या दुरूस्तीसाठी निधी दिला, याशिवाय रस्ते, नाल्या, जलयुक्त शिवार आदी कोट्यवधी रुपयांची कामे केली. आगामी काळात आणखी विकास साधायचा आहे, इथली जनता मुंडे साहेबांच्या जशी पाठिशी होती, तशीच माझ्याही पाठीशी खंबीरपणे उभा आहे, मला आपली सेवा करण्याची पुन्हा संधी द्यावी असे आवाहन त्यांनी केले. 

राष्ट्रवादीचे फड भाजपात 

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते डॉ. परमेश्वर फड यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. ना. पंकजाताई मुंडे यांनी सर्वांचे स्वागत केले. 
यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष शिवाजी गुट्टे, परमेश्वर फड, प्रा. बिभीषण फड, भास्कर फड, व्यंकटराव फड, ईश्वर क्षीरसागर, उत्तम दहिवाळ, हिरामन फड, दिलिप फड, वासुदेव फड, अशोक फड, लक्ष्मणराव फड, राम फड, विश्वनाथ बागमारे, आदेक शहा, मुनीर पठाण, मंचक घोबाळे, पप्पू फड, माधव दहिफळे, संजय फड, प्रल्हाद दहिफळे, विठ्ठल फड, ज्ञानोबा फड, मधुकर फड, कौसर शहा, खाजा पठाण आदींसह कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a comment