तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 28 October 2019

परळीकरांना गीत-संगीताचे अभ्यंगस्नान; मारवाडी युवा मंचच्या पहाटगाणी कार्यक्रमास मोठा प्रतिसाद
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
उठ पंढरीचा राजा, वाढ वेळ झाला, कर्ता रे गणपती गजानन, भाग्यदा लक्ष्मी अशा एकापेक्षा एक सरस आणि भावस्वर असलेल्या मराठी-हिंदी गीतांच्या माध्यमातून मारवाडी युवा मंचने परळीकरांना दिवाळीनिमित्त गीत-संगीताचे अभ्यंगस्नान घडविले. आज लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंग मंदिरात पहाट गाणी हा कार्यक्रम पार पडला. मागील 20 वर्षापासून दिवाळी आणि पहाटगाणी असे एक समिकरण परळी शहरात रुजले असून यावर्षीच्याही कार्यक्रमाला दर्दी रसिकांनी मोठी गर्दी केली होती.
मारवाडी युवा मंच परळीच्या वतीने आज पहाटगाणी हा कार्यक्रम अत्यंत उत्साहपुर्ण वातावरणात पार पडला. एकीकडे दिवाळीचे अभ्यंगस्नान होत असतांना दुसरीकडे रसिक गीत-संगीताचे अभ्यंगस्नान करीत होते. मारवाडी युवा मंच व  स्वरनक्षत्र कला अकादमी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पुण्यातील प्रसिद्ध गायीका डॉ. अनघा राजवाडे यांच्यासह प्रसिद्ध कलावंत कृष्णा बळवंत, कुमार पुराणिक, सौ. निता बळवंत, शेखर स्वामी, अनंत फटाले, ऋषीकेश बळवंत, मंथन सोनी आदींच्या गीतगायनाची आज मैफलच भरली होती. सुर निरागस हो, आज राणी पुर्वीची ती, बाबूजी धिरे चलना, लग जा गले, मन मंदिरा, जागो मोहन प्यारे, बैय्या न धरो अशा एकापेक्षा एक सरस गीतांनी पहाट गाणी कार्यक्रम रंगात आला होता.
आज पहाटे फटाके फोडत या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. मारवाडी युवा मंचच्या वतीने या कार्यक्रमास उपस्थित असलेले माजी मंत्री पंडितराव दौंड यांचे स्वागत करण्यात आले. याच कार्यक्रमात संगीताची साथ देणारे सिद्धोधन कदम, गौतम डावरे, आदित्य डावरे, कार्यक्रमाचे संचलन करणारे चंद्रशेखर फुटके यांचा सत्कार करण्यात आला.  कार्यक्रमास मारवाडी युवा मंचचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी, सचिव जयपाल लाहोटी, ओमप्रकाश सारडा, अनिल मोदाणी, सतिश सारडा, बालचंद लोढा, अशोक कांकरिया, चंद्रप्रकाश काबरा, गोविंद सोमाणी, संजय दरक, रमेश सारडा , अजय पुजारी यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.

No comments:

Post a Comment