तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 6 October 2019

एसटी बस कारवर आदळली
डोणगांव :-- अचानक महामार्गावर म्हसी आडव्या आल्याने बसचा अपघात घडल्या ची घटना 6 आक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता गोहगांव फाट्यावर घडली. सुदैवाने या अपघातात कुणीही जखमी झाले नाही.
नागपुर ते औरंगाबाद (एम. एच. 11बीएल 9213) क्रमांकाची बस गोहगांव फाट्याजवळ आली असताना पाऊस सुरू झाला अचानक तीन ते चार म्हशी बस समोर आल्या. म्हशींना वाचविण्यासाठी चालकाने प्रयत्न केला असता बस खड्यात गेली. त्यामुळे बस चा युक्लॉम तुटली. व बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याने जाणाऱ्या कारवर आदळली. या अपघातात कारचे अंदाजे 2लाखा रूपयांचे नुकसान झाले. अपघातात दोन्ही वाहनातील कुणीच जखमी झाले नाही. या प्रकरणी डोणगाव पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल अरुण खनपटे करीत आहेत.

No comments:

Post a comment