तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 18 October 2019

खा.शरदचंद्र पवार यांच्या रेकॉर्ड ब्रेक सभेने विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे व माजी आ.पृथ्वीराज साठे यांच्या विजयावर शिक्कामोर्तब ; महाराष्ट्रातील जनताच भाजपाची सत्ता घालवणार- शरदचंद्र पवार

 (प्रतिनिधी) :-  निवडणूकीला सामोरे जाता येईना म्हणुन भाजपा सरकार सत्तेचा गैरवापर करून विरोधकांवर खोटे गुन्हे नोंदवत आहे.सर्वसामान्य जनतेचे प्रश्‍न गेल्या पाच वर्षांत सोडवता आले नाही. 370 कलम या बाबत दिशाभुल करून या सरकारने महाराष्ट्रावर कर्जाचा डोंगर उभा केला आहे.शेतकर्‍यांना कर्जमाफी नाही.परंतु, उद्योगपतींना हजारो कोटी रूपये माफ केले जातात.हा वेगवेगळा न्याय का असा सवाल करून सरसकट कर्जमाफी करा आणि बळीराजाला आत्महत्येपासुन वाचवा गेल्या पाच वर्षांत काय केले ते आधी सांगा.छत्रपती शिवाजी महाराज,विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांचे काय झाले.? महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास असणारे महाराजांचे गडकिल्ले सांभाळता येत नाहीत.त्यामुळे हे सरकार इतिहास पुसून टाकु पाहत आहे.ते महाराष्ट्र कदापिही
सहन करणार नाही.महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाण,वसंतराव नाईक,वसंतदादा पाटील आणि शंकरराव चव्हाण यांच्यासारखे प्रभावी मुख्यमंत्री लाभले.या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व समाजघटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणले.परंतु, भाजपा सरकारने मात्र जनतेला खोटी आश्‍वासने दिली.देशातील सामान्य माणूस ही अमित शहाला ओळखत नाही.भाजपा सरकारच्या काळात 16 हजार शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. 
त्यामुळे सर्वच क्षेत्रांत अपयशी ठरलेल्या भाजपा सरकारची सत्ता महाराष्ट्रातील जनताच आता घालवणार असे सांगुन मी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचा अध्यक्ष आहे.लहान लेकरांशी कुस्ती खेळत नाही.कारण, रेवड्या कुस्ती खेळायची ही विरोधकांची कुवत नाही.मग दिल्लीतून पंतप्रधान,गृहमंत्री विविध राज्याचे मुख्यमंत्री यांना बोलावुन दिल्लीची जत्रा महाराष्ट्रात का भरवली ? असा 
मार्मिक सवाल करून परळी विधानसभा मतदारसंघातून ना.धनंजय मुंडे व केज विधानसभा मतदारसंघातून पृथ्वीराज साठे यांना प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा. शरदचंद्रजी पवार यांनी केले.


विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे व माजी आ.पृथ्वीराज साठे यांच्या विजयासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा.शरदचंद्रजी पवार यांची शुक्रवार,दि.18 ऑक्टोबर रोजी शंकर महाराज वंजारी वसतीगृह मैदान अंबाजोगाई येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती.ही सभा विजयावर शिक्कामोर्तब करणारी ठरली.सभेचे 
अतिशय नेटके नियोजन बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी,बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बजरंगबप्पा सोनवणे,राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ.नरेंद्र काळे यांनी केले होते. प्रचंड संख्येने लोक सभास्थळी उपस्थितीत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा.शरदचंद्रजी पवार,विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते व उमेदवार ना.धनंजय मुंडे,उमेदवार माजी आ.पृथ्वीराज साठे,बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी,बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बजरंगबप्पा  सोनवणे,माजी मंत्री अॅड.
पंडितराव दौंड,अंबाजोगाईच्या
नगराध्यक्षा सौ.रचनाताई मोदी, केजचे नगराध्यक्ष अदित्यदादा पाटील,राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ.नरेंद्र काळे, बाबुराव मुंडे,नगरसेवक बबनराव लोमटे,विलासराव सोनवणे,दत्तात्रय पाटील, प्रा.मिलींद आव्हाड,कॉ. बब्रुवाहन पोटभरे,कुलदिप करपे,सुनिल जगताप, तुळशीराम पवार,भाई मोहन गुंड,गोविंदराव देशमुख,राजेश्‍वर चव्हाण,संजयभाऊ दौंड,अ‍ॅड. अनंतराव जगतकर,कमलताई निंबाळकर,नंदकुमार मोराळे, ज्ञानोबा कांबळे,हाफीज सिद्दीकी,बन्सीआण्णा जोगदंड, रवि देशमुख,वसंतराव उदार, किशोर परदेशी,हनुमंतराव मोरे,राहुल सोनवणे,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष औदुंबर मोरे यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांनी परळी मतदारसंघात देशाच्या पंतप्रधानांना सभा घ्यावी लागते यावरूनच भाजपाचा पराभव अटळ असल्याचे सांगुन भाजपाने जिल्ह्यातील जनतेला भावनिक करून डोळ्यांत पाणी आणून निवडणूका जिंकल्या. परंतु,जिल्ह्याचा विकास मात्र केला नाही.त्यामुळे या निवडणूकीत आपण राष्ट्रवादीला आशिर्वाद द्यावेत.आम्ही सर्वसामान्यांचे सर्व प्रश्‍न सोडवू असे सांगुन ज्याने आईचा शब्द पाळला नाही.तो जनतेचा काय होणार.? केज मतदारसंघात भाजपाची पंचाईत झाली आहे. पृथ्वीराज साठे हे नशिबवान आहेत असे सांगुन मुंडे यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पृथ्वीराज साठे यांना प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन केले.प्रारंभी प्रास्ताविक करताना बजरंग सोनवणे यांनी विरोधक खोटे आरोप करून भाजपात गेले.त्यामुळे त्यांना टिका करण्याचा नैतिक अधिकार नाही.

No comments:

Post a comment