तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 9 October 2019

भगवान बाबा, लोकनेते मुंडेंनी वंचितांसाठी केलेले कार्य पंकजाताई ताकदीने पुढे नेत आहेत- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून पंकजाताईंच्या नितिमत्तेच्या राजकारणाचा गौरव
भगवान भक्ती गडावर उसळला जनसागर 

येत्या पाच वर्षात ऊसतोड मजूर बांधवांना हातात कोयते घेण्याची वेळ येऊ देणार नाही - ना. पंकजाताई मुंडे

महादेव गित्ते | सावरगाव घाट ( भगवान भक्तीगड) (प्रतिनिधी) :-  दि. ०८ ----  संत भगवान बाबा यांचे विचार आणि स्मृती कायम तेवत ठेवण्यासाठी पंकजाताई मुंडे यांनी विशाल असे स्मृती स्थळ उभे केले. हे भव्य स्मृतीस्थळ शेकडो वर्षे वंचित समाजाला उर्जा आणि ताकत देत राहील असे सांगत महान नेता गोपीनाथराव मुंडे यांनी भगवान बाबा यांचे विचार अजरामर केले. त्याच भगवान बाबा आणि ऊसतोड मजूरांसाठी आयुष्य वेचणार्‍या गोपीनाथराव मुंडे यांचे कार्य पंकजाताई मुंडे ह्या अतिशय ताकतीने पुढे नेत आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय गृह मंत्री अमीत शहा यांनी केले.

भगवान भक्ती गडावर लाखो मुंडे प्रेमींच्या उपस्थितीत झालेल्या दसरा मेळाव्यात ते बोलत होते. संत भगवान बाबा यांची जन्म भूमीत सावरगाव येथे आज अतिशय उत्साहाच्या वातावरणात दसरा मेळावा संपन्न झाला. आजपर्यंतच्या इतिहासातील गर्दीचे सारे विक्रम यावर्षीच्या दसरा मेळाव्याने मोडले. सात- ते आठ लाख भक्तांची यावेळी उपस्थिती होती. यावेळी क्रेंद्रीय गृह मंत्री अमीत शहा, ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे, विधानसभा अध्यक्ष  हरिभाऊ बागडे, भुपेंद्र यादव, विजयराव पुराणिक, ना. राधाकृष्ण विखे पाटील, खा. प्रीतमताई मुंडे, ना. जयदत्त क्षीरसागर, महादेव जानकर, प्रा. राम शिंदे, खा. ओमराजे निंबाळकर, आ. भिमराव धोंडे यांची प्रमुख व्यासपीठावर उपस्थिती होती. तर बाजूच्या व्यासपीठावर बीड जिल्ह्यासह आजू बाजूच्या जिल्हयातील आमदार, माजी आमदार आणि प्रमुख नेते बसले होते.

  यावेळी पुढे बोलताना केंद्रीय गृह मंत्री अमीत शहा म्हणाले की, पाच वर्षापुर्वी 2014 मध्ये दसर्‍याच्या दिवशीच भगवान गडावर आलो होतो. आज पाच वर्षांनंतर भगवान बाबांची जन्मभूमी असलेल्या भगवान भक्तीगडावर आलो आहे. या ठिकाणी आल्यानंतर भगवान बाबा यांची विशाल मुर्ती पाहिली. या मुर्तीचे पुजन केले. पंकजाताईंनी भगवान बाबा यांच्या चिरंतर तेवत ठेवण्यासाठी विशाल असे स्मृती स्थळ उभे केले आहे. पंकजाताईंनी उभे केलेले हे स्मृतीस्थळ भविष्यात शेकडो वर्षे वंचीतांना प्रेरणा आणि उर्जा देण्याचे काम करणार आहे. विसाव्या शतकात जन्मलेल्या भगवान बाबा यांनी आपले सारे आयुष्य गरीब आणि वंचीत समाजात बदल घडवण्यासाठी, अशिक्षीत समाजाला शिक्षीत करण्यासाठी घालवले. त्यांना संघर्ष तर शिकवलाच मात्र सन्मानाने जगण्याची शिकवण देत प्रगतीचा मार्गही दाखवला. मेहनत आणि शिक्षणातूनच समाजाची प्रगती होऊ शकते हे त्यांनी तळागाळातील सर्व समाजाला सांगीतले. अशा या थोर संताने दाखवून दिलेल्या मार्गावरून चालत आमचे नेते स्व. गोपीनाथजी मुंडे यांनी भगवान बाबा यांचे कार्य आणि त्यांच्या स्मृती चिरंतर तेवत ठेवण्यासाठी खुप कष्ट घेतले. मला सर्वाधिक आनंद या गोेष्टीचा वाटतो की, संत भगवान बाबा आणि स्व. गोपीनाथजी मुंडे यांच्या दाखवून दिलेल्या वाटेवरून चालताना महाराष्ट्रातील सार्‍या वंचीतांना पुढे घेऊन जाण्यासाठी ताकतीने काम करत आहेे. साखर कारखान्यात काम करणारे ऊसतोड मजूरांच्या जीवन सुकर करण्यासाठी लोकनेते मुंडे यांनी आयुष्य वेचले. त्याच ऊसतोड मजूर आणि वंचीतांना न्याय मिळवून देण्याचे काम पंकजाताई मुंडे ह्या करत आहेत.
पुढे बोलताना ते म्हणाले की, मराठवाडा आणि राज्यभरात भगवान बाबा यांचा भक्त परिवार आहे. या गरीब आणि वंचीत समाजासाठी पंकजाताई मुंडे यांनी भगवान बाबाच्या जन्मस्थळी भव्य स्मारक उभे करण्याची घोषणा केली अन् आज भगवान भक्तीगड हे भव्य स्मारक उभे राहीले आहे. भगवान बाबा यांचे हे स्मृतीस्थळ भविष्यातील शेकडो वर्षे वंचीत समाजाला शक्ती आणि उर्जा देण्याचे काम करणार आहे, असे सांगत पंकजाताई यांच्या कार्याचा अमीत शहा यांनी गौरव केला. मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्रातील सरकार ओबींसींना न्याय देण्याचे काम करत आहे, पंकजाताई यांनी थोर संताचे एवढे मोठे स्मारक उभे केले. याबद्दल मी त्यांचे मनापासून कौतुक करतो. दसरा हा चांगल्या गोष्टींचा वाईटावर विजयाचे प्रतिक आहे. वाईट, दुष्ट शक्तीचा नाश करण्याचा विचार घेऊन आपण आज येथून जावून असे ते शेवटी म्हणाले.
मोदीजींना 300 शिट दिले अन् मोदींनी तीन महिन्याच्या आत 307 कलम हटवले. मोदींनी कलम 307 हटवून सार्‍या देशाला राष्ट्रभक्तीच्या एका धाग्यात बांधले आहे. मोदींनी घेतलेल्या या धाडसी निर्णयाच्या समर्थनाचा विचार भगवान बाबांचे भक्त घेऊन जातील, असे अमीत शहा म्हणाले.

  मोदींनी ओबीसींना संवैधानिक दर्जा दिला 70 साला पासून देशात कॉंग्रेसचे सरकार होते. 

No comments:

Post a comment