तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 5 October 2019

भाजपची सत्ता असतानाही परळी मतदारसंघाला


पीक विमा का मिळाला नाही?- सौ.राजश्रीताई मुंडे
धनंजय मुंडेंच्या प्रचारार्थ घाटनांदूर, नवाबवाडीत बैठका

अंबाजोगाई (प्रतिनिधी) :- दि.05........... भाजपची सत्ता असताना आणि परळी मतदारसंघाच्या आमदार मंत्री असतानाही परळी व अंबाजोगाई तालुक्याला पीक विमा का मिळाला नाही ? असा सवाल सौ.राजश्रीताई मुंडे यांनी केला. निष्क्रीय आमदारामुळे परळी मतदारसंघातील शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहिला मात्र धनंजय मुंडे यांनीच या शेतकर्‍यांना न्याय मिळवून दिल्याचा दावाही त्यांनी केला.

परळी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडी व मित्र पक्षाचे उमेदवार धनंजय मुंडे यांच्या प्रचारार्थ सौ.राजश्रीताई यांनी आज अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर व नवाबवाडी या गावांचा दौरा केला. मतदारांच्या गाठी-भेटी घेताना त्यांनी धनंजय मुंडे यांना विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांच्या समवेत जि.प.सदस्या शिवकन्याताई सिरसाट, पं.स.सभापती मिनाताई भताने, सरपंच ज्ञानोबा जाधव, शिवाजी सिरसाट, अजितदादा देशमुख, गणेश देशमुख, नाथराव घुले, दत्ताभाऊ घुले, अ‍ॅड.घुले आदींसह स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

संपूर्ण महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागाला पीक विमा मंजूर होतो, मात्र 3 वर्षांपासून दुष्काळ सोसणार्‍या परळी व अंबाजोगाई तालुक्याला पीक विम्यातून का वगळले जाते असा सवाल करत बीड जिल्ह्यातील इतर 9 तालुक्यांनाही पीक विमा मिळाला मात्र मंत्री असूनही परळीच्या आमदारांना आपल्या तालुक्याला पीक विमा मिळवून देता येवू नये यासारखे दूर्देव नाही. धनंजय मुंडे यांनी संघर्ष केला नसता तर या मतदारसंघातील शेतकर्‍यांना पीक विमा कदापिही मिळाला नसता. याची आठवण करून देतानाच जनसामन्यांसाठी संघर्ष करणार्‍या धनंजय मुंडे यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.

No comments:

Post a Comment