तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 18 October 2019

नरेंद्र मोदींच्या सभेवरून परळीत राष्ट्रवादी काँग्रेसचा थयथयाट ; ना. पंकजाताई मुंडेंविरूध्द खोट्या बातम्या पेरण्याचे षडयंत्र ; जनतेत तीव्र संतापपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऐतिहासिक सभेला मिळालेला प्रचंड प्रतिसाद व ना. पंकजाताई मुंडे यांचा वाढता प्रभाव पाहून राष्ट्रवादी काँग्रेस गर्भगळीत झाली आहे. आज दिवसभरात त्यांनी  ना. पंकजाताई मुंडे, वंजारी समाज व प्रभू वैद्यनाथ यांच्याबद्दल वेगवेगळ्या स्वरूपाच्या खोट्या बातम्या पसरवून  थयथयाट केला, त्यांचे हे षडयंत्र लोकांच्याही लक्षात आल्याने त्यांचेविरूध्द प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ना. पंकजाताई मुंडे आणि भाजपा महायुतीचे जिल्हयातील सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ परळीत जाहीर सभा घेतली. या सभेला सुमारे अडीच लाखांहून अधिक लोक जमा झाले होते, प्रचंड गर्दी व सर्वत्र उत्साह आणि जल्लोषाचे वातावरण पहायला मिळाले. सर्व सामान्य माणसापासून ते प्रतिष्ठितापर्यंत सर्व जण मोदींचे विचार ऐकण्यासाठी आले होते. तरूण, वृध्द व महिलाही मोठ्या संख्येने आल्या होत्या. सभेमुळे ना. पंकजाताई मुंडे यांचे पारडे अधिकच जड होत असल्याचे पाहून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिवसभरात सोशल मिडियात वेगवेगळ्या स्वरूपाच्या खोट्या बातम्या पेरून वातावरण कलुषित करण्याचा उद्योग सुरू केला. परळी पिंपळा रस्ता, वैद्यनाथ मंदिर, गोपीनाथ गडावर मोदी गेले नाहीत, वंजारी समाजात नाराजी अशा स्वरूपाच्या समाजा समाजात दुही पसरविणा-या बातम्या व्हायरल करून आपल्या अकलेचे तारे तोडले, त्यांच्या या कृतीविरूध्द जनतेत मात्र मोठा रोष व्यक्त होत होता.

No comments:

Post a comment