तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 10 October 2019

सौ.राजश्रीताई मुंडेंचा डीग्रस, रामेवाडीत मतदारांशी संवाद ; सिरसाळा गटाशी मुंडे कुटुंबियांचा विशेष स्नेह आहे

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.10................ सिरसाळा जिल्हा परिषद गटातून स्व.पंडीतअण्णा मुंडे यांनी प्रतिनिधीत्व केले आहे. या भागातील जनतेने मुंडे कुटुंबियावर नेहमीच प्रेम केले असून, अण्णांचेही या भागावर कायम प्रेम आणि लक्ष होते. यापुढेही विकासाच्या माध्यमातून हा स्नेह अधिक वृध्दिंगत करायचा असून, त्यासाठी धनंजय मुंडे यांना विजयी करण्याचे आवाहन सौ.राजश्रीताई मुंडे यांनी केले आहे.

सौ.मुंडे यांनी सिरसाळा जिल्हा परिषद गटातील डिग्रस, रामेवाडी येथील मतदारांशी संपर्क केला. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेश उपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी त्यांच्या समवेत केंद्रे ताई,  वैजनाथ पौळ, प्रभाकर पौळ, राजेभाऊ पौळ, सरपंच दिनकर अंबुरे, उपसरपंच नगनाथ अंबुरे, संजय भद्रे, भानुदास कुकडे, विष्णु पौळ, भास्कर अंबुरे, दत्ता कुकडे, भीमराव आवाड, लक्ष्मण खंडाळे, दगडूभाई शेख, भास्कर मिसाळ, अशोक मुळे, बाळकृष्ण गव्हाणे, उध्दवराव अंबुरे, मारोती अंबुरे, बबन अबुज, राजभाऊ अंबुरे, संतोष पोटफोडे, बंडू वाघमारे, रामडू पौळ आदी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डिग्रस हे मतदारसंघातील पहिल्या क्रमांकाचे गाव आहे, विकासाच्या बाबतीत हे गाव एक नंबरवर नेण्याचे आमचे स्वप्न असून, हा जिल्हा परिषद गटही मतदारसंघात सर्वात विकसित असेल, यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही देवून एक नंबरच्या गावातून सर्वाधिक मताधिक्य देवून विजयाचा शुभारंभ करावा, असे आवाहन त्यांनी केले.

No comments:

Post a comment