तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 9 October 2019

धनुभाऊच्या स्टेजवर गर्दी मावेना; भाजपचे स्टेजवर कोणी फिरकेना ; परळीच्या दसरा महोत्सवात पुन्हा एकदा आली धनंजय मुंडे यांच्या लोकप्रियतेची प्रचिती(प्रतिनिधी) :- दि 7----- धनुभाऊ च्या स्टेजवर गर्दी  मावेना आणि भाजपच्या स्टेजवर कोणी फिरकेना,  असे चित्र आज परळी शहरातील कालरात्री मंदिर परिसरात परळी करांना पाहायला मिळाले.  यानिमित्ताने पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्या लोकप्रियतेची प्रचितीच दिसून आली. 

 विजयादशमी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी प्रतिवर्षी शहरातील काल रात्री देवी मंदिर परिसरात दसरा महोत्सव साजरा केला जातो.  या ठिकाणी परिसरातील नागरिक एकमेकांना सोने म्हणजेच आपट्याची पाने देऊन शुभेच्छा देतात व सीमोल्लंघन करून आपापल्या घरी परततात. 

 याठिकाणी प्रत्येक वर्षी सर्व राजकीय पक्षांच्या वतीने स्टेज उभे करून त्याद्वारे वेगवेगळ्या पक्षातील मंडळी  शुभेच्छा देत असतात . दरवर्षीप्रमाणे यावेळीही राष्ट्रवादी काँग्रेस,  भारतीय जनता पार्टी आणि वंचित आघाडी ने आपले स्टेज उभे केले होते.  राष्ट्रवादीच्या स्टेजवर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह माजी मंत्री पंडितराव दौंड, ज्येष्ठ नेते बाबुराव मुंडे, माजी नगराध्यक्ष सोमनाथअप्पा हालगे,  शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी , युवक नेते अजित पवार, माजी शहराध्यक्ष चंदुलाल बियाणी ज्येष्ठ नेते बाळासाहेब देशमुख,  वैजनाथ सोळंके, प्रा. डॉ. विनोद जगतकर यासह काँग्रेसचे वसंत मुंडे व राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. 

 स्टेजवर धनुभाऊंना शुभेच्छा देण्यासाठी यावेळी प्रचंड गर्दी उसळली होती. 

 यावेळी  मान्यवरांनी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या . तरुणांची सेल्फी काढण्यासाठी तर प्रचंड गर्दी झाली होती.  अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्ध नागरिकांपर्यंत ही सर्वजण धनंजय मुंडे यांना भेटण्यासाठी  आतुर झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. 

 दुसरीकडे याच व्यासपीठाच्या बाजूला भाजपच्या व्यासपीठावर ही भाजपची मंडळी शुभेच्छा देण्यासाठी थांबली होती मात्र त्यांच्याकडे कोणीच फिरकेना.  ते व्यासपीठ चक्क मोकळे असल्याने दिसून येऊ लागले,. शेवटी लोक आपल्याकडे येत नाही ते पाहून जमलेल्या भाजपच्या  कार्यकर्त्यांनी नेतेमंडळींना शुभेच्छा देण्यासाठी लाईन लावली आणि फोटो काढून घेऊन आपले समाधान मानले. 

 या निमित्ताने पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांची परळी शहरात लोकप्रियता किती आहे याची प्रचिती आली आहे.

No comments:

Post a comment