तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 18 October 2019

धो-धो पावसात गुरू शिष्यांची सरकारविरुद्ध तुफान बॅटिंग!सातारा/परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  2019 च्या विधानसभा निवडणुकीतील आजचा दिवस एक वेगळ्याच कारणाने चर्चेत आला. ते म्हणजे राष्ट्रवादीचे दोन नेते भर पावसात सरकारची धुलाई करत होते. एक होते 80 वर्षांचे शरद पवार तर दुसरे होते महाराष्ट्रातील तरुणाईच्या गळ्यातील ताईत धनंजय मुंडे! पक्षात व बाहेरही गुरू-शिष्य म्हणून प्रसिद्ध असलेले पवार - मुंडे योगायोगाने एकाचवेळी भाषणाला उभे राहिले व पाऊसही त्याच वेळी आला. 

साताऱ्यात शरदचंद्र पवार यांनी तर त्यांचे शिष्य धनंजय मुंडे यांनी परळी तालुक्यातील सिरसाला येथे आज भर पावसात भाजप सरकारविरुद्ध तुफान बॅटिंग केली. शरद पवार यांनी उदयनराजे यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावले, एवढ्या तुफान पावसात सुद्धा शरद पवार यांच्यासह जमलेला अफाट जनसमुदाय तीळभर सुद्धा हलला नाही. तर दुसरीकडे परळी येथील सभेत पवारांचे शिष्य धनंजय मुंडे यांनीही भाजप सरकारला चांगलेच धारेवर धरले.

मागील निवडणुकीत माझ्याकडून चूक झाली, ती मी कबूल करतो व आता तुम्ही 21 तारखेला ती चूक दुरुस्त करा असे म्हणत शरद पवार यांनी भाजप सेनेच्या सरकारसह सातारमध्ये परिवर्तन करण्याचे आवाहन केले. 

दुसरीकडे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी नरेंद्र मोदी - अमित शहा यांच्या बीड जिल्ह्यातील प्रचार सभांसह आजच्या उदयनराजे यांच्या परळी येथील सभेचाही समाचार घेतला. भर पावसात मुंडे व समोर बसलेला जनसमुदाय भिजत असतानाही तब्बल 28 मिनिटे चाललेल्या भाषणात कोणीही जागचे हलले नाही, हे विशेष! मुंडेंनी परळीत मोदी परळीत आल्याने फरक पडेल का असे विचारताच उपस्थितांनी "परळीत नो सीएम नो पीएम, ओन्ली डीएम, ओन्ली डीएम" असा एकच जयघोष केला. 

योगायोगाने एकाच वेळी धो-धो पावसातही सरकारवर तुफान बरसणाऱ्या पवार - मुंडे या गुरू शिष्यांच्या जोडीने आज मैदाने तर गाजवलीच पण एकीकडे पवारांनी वयावर मात करत तर प्रकृती ठीक नसतानाही धनंजय मुंडेंनी त्याकडे दुर्लक्ष करत सभा गाजवल्या त्यामुळे दोन्ही ठिकाणी श्रोत्यांनीही प्रचंड उत्साह दाखवला, यामुळे आजच्या या दोन्ही सभा विशेष स्मरणीय असतील असेच म्हणावे लागेल.

No comments:

Post a Comment