तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 12 October 2019

दुष्काळातही परळीकरांची तहान भागवणार्‍या धनंजय मुंडेंच्या पाठीशी रहा- सौ.राजश्रीताई मुंडे पंधरा दिवसात खडक्याचे पाणी आणणार होतात त्याचे काय झाले ? पंकजाताईंना सवाल
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.12......... संपूर्ण शहर दुष्काळामुळे त्रस्त असताना परळीकरांची तहान भागवण्याचे काम धनंजय मुंडे यांनी केले आहे. दुसरीकडे निवडणूकीच्या तोंडावर 15 दिवसात खडक्याचे पाणी आणण्याची घोषणा करणार्‍यांना निवडणुकीच्या तोंडावर तरी दिलेल्या आश्वासनाची आठवण आहे का ? असा सवाल सौ.राजश्रीताई मुंडे यांनी उपस्थित केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडी व मित्र पक्षाचे उमेदवार धनंजय मुंडे यांच्या प्रचारार्थ सौ.राजश्रीताई यांनी आज शहराच्या जुन्या गाव भागातील माजी नगराध्यक्षा दिपकनाना देशमुख यांचे निवासस्थानी तसेच सावतामाळी मंदिर, खंडोबा मंदिर, बिडगर गल्ली, विलास जुनाळ घर, झारेकर गल्ली, कुंभारवाडा, कालिंका मंदिर, मेहंदीपुरा, लाहोटी गल्ली, ताटे गल्ली, रोडे गल्ली, ताटेनगर, भिमनगर, फुले चौक, देशमुख गल्ली, गोरा राम मंदिर,  होळकर चौक, गणेशपार, गौंडे गल्ली आदी भागात महिलांच्या कॉर्नर बैठका घेतल्या, यावेळी त्या बोलत होत्या. त्यांच्या समवेत नगराध्यक्षा सौ.सरोजनीताई हालगे, मनिषाताई मुंडे, केंद्रे ताई, माजी जिल्हाध्यक्षा रेखाताई फड, संध्याताई दिपक देशमुख, चित्राताई देशपांडे, कल्पनाताई देशमुख, सौ.रेणुकाताई वैजनाथ सोळंके, धुमाळताई आदींसह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

नागापूरचे वाण धरण आटले असतानाही धनंजय मुंडे यांनी नगरपालिका, नाथ प्रतिष्ठान आणि नगरसेवकांच्या प्रयत्नांमधून परळी शहराला 8 महिने पाण्याची टंचाई जाणवू दिली नाही. दुष्काळाच्या प्रसंगी तुमच्या अडचणीला धावून येणार्‍या माणसाच्या पाठीमागे तुम्ही उभे राहणार नाहीत का ? या त्यांच्या प्रश्नाला महिलांनी आम्हाला पाणी दिले त्याची जाणीव ठेवून धनंजय मुंडेंनाच मतदान करू अशी ग्वाही दिली.
खडका धरणातून परळीला पाणी पुरवठा करण्यासाठी धनंजय मुंडेंनी प्रयत्न केले, आमच्या नगरसेवकांनी उपोषणे केली, न्यायालयात धाव घेतली त्यावेळी पालकमंत्री कुठे होत्या ? असा प्रश्न विचारताना पाणी येण्याच्यावेळी मात्र त्यांना श्रेय घेण्यासाठी पुढे यावे वाटले. श्रेय घ्यायचेच होते तर 15 दिवसात पाणी तरी आणता आले का ? असा खोचक सवालही त्यांनी विचारला.

No comments:

Post a comment