तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 17 October 2019

ना.पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ निळकंठ चाटे व प्रल्हाद सुरवसे यांचा शिवाजीनगर भागात झंझावती प्रचार

 वै. (प्रतिनिधी)ः- परळी विधानसभा निवडणुकीतील भाजपा महायुतीच्या उमेदवार ना.पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ भाजपाचे युवक नेते निळकंठ चाटे व प्रल्हाद सुरवसे यांनी शिवाजीनगर भागात प्रचार फेरी काढली. त्यांच्या प्रचार फेरीस मतदारांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.
प्रभाग क्र.9 शिवाजीनगर भागात आज निळकंठ चाटे व प्रल्हाद सुरवसे यांच्या नेतृत्वाखाली भव्य प्रचार फेरी काढण्यात आली. घरोघरी जावुन आपल्या भागाच्या विकासासाठी ना.पंकजाताई मुंडे यांनाच प्रचंड मतांनी विजयी करण्याचे त्यांनी आवाहन केले. मतदारांनीही ना.पंकजाताई मुंडे यांनाच विजयी करण्याचे अभिवचन दिले.

No comments:

Post a comment