तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 12 October 2019

... अखेर मोरेगाव बंधाऱ्यात साठले पाणी
परभणी : सेलू (जि.परभणी ) तालुक्यातील
मोरेगाव बंधार्‍याचे दरवाजे बंद केल्यामुळे सप्टेंबर व ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात  झालेल्या पावसामुळे 
बंधारा पूर्णतः भरल्याने जनावरांच्या पिण्याचा पाणी प्रश्न बर्‍याच अंशी दूर झाला आहे.
दोन जूनला परभणी शहर व नदीकाठच्या गावांतील नागरिकांना,जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी एकूण 
१५.४८ दलघमी पाणी नदीपात्रात पाणी सोडण्यात आले होते. त्यावेळी सेलू तालुक्यातून तीव्र विरोध असतानांही प्रशासनाने चुकीचे धोरण घेतल्यामुळे मोरेगाव बंधार्‍याचे दरवाजे उघडे ठेवण्यात आले. परिणामी दुधना नदीपात्र कोरडे पडले होते. त्यानंतर २५ ऑगस्ट रोजी सेलू तालुका दबाव गटाच्या ॲड.श्रीकांत वाईकर ॲड.टी.ए.चव्हाण, राजेंद्र केवारे, ओमप्रकाश चव्हाळ, सतीश काकडे आदींनी उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांना निवेदन देत सद्यस्थितीतील पाऊसमानाची परिस्थिती लक्षात घेता, दुधना नदीवरील मोरेगाव
बंधाऱ्याचे दरवाजे बंद करावेत अशी मागणी केली होती. त्याची दखल घेत प्रशासनाने मोरेगाव बंधाऱ्याचे दरवाजे बंद केले. आहे. त्यामुळे सप्टेंबर व ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे बंधारा पूर्णतः भरला आहे व बॅकवॉटर चार किलोमीटरवर गेले आहे. त्यामुळे जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न बर्‍याच अंशी सुटण्यास मदत होईल, दरम्यान
परतीचा पावसाळा संपत आला आहे. तरीही निम्न दुधना  प्रकल्पात पाण्याची आवकच नाही. सध्या केवळ ६० दलघमी पाणी साठा आहे. अशीच परिस्थिती राहिली तर पुढे सेलू शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ शकतो.

फोटो : सेलू (जि.परभणी ) तालुक्यातील मोरेगाव बंधाऱ्यात साठलेल्या पाण्यामुळे चार किलोमीटपर्यंत बॅकवॉटर गेले आहे.

पूर्ण...

No comments:

Post a Comment