तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 17 October 2019

वंचित उमेदवार भिमराव सातपुते यांच्या प्रचारात परळीत आघाडीदलित-मुस्लिम बेल्टमध्ये भिमराव सातपुतेंच्या गॕस सिलेंडरचा झंझावात

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
दलित-मुस्लिम मतदाराला राष्ट्रवादी काॕग्रेस,काॕग्रेस आमची हक्काची मत म्हणुन मक्तेदारी समजतात तर भाजपावाल्यानी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी  सर्वसामान्य नागरिकांना दिलेल्या लोकशाहीचेच रुपांतर हुकुशाही आणण्यासाठी रणनिती आखली जात आहे. पुरोगामीच सोंग घेणाऱ्या राष्ट्रवादी काॕग्रेस,काॕग्रेसला आणी देशाला हुकुशाहीकडे घेऊन जाणाऱ्या भाजपा-शिवसेनेची हि कुटनिती आता सर्वसामान्य जनतेच्या लक्षात आली असुन वंदनीय अॕड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित समाज एकञ आला आहे तेव्हा परळी विधानसभा मतदार संघातुन भिमराव सातपुते यांच्या गॕस सिलेंडर या निवडणूक निशानीवरच मतदान करुन अॕड.बाळासाहेब आंबेडकरांचे हात बळकट करणार असल्याचे सत्तेच्या कोसोदुर ठेवलेल्या दलित-मुस्लिम वंचित मतदारांनी केला आहे.
बुधवारी परळी शहरातील दलित मुस्लिम बहुलभागात वंचितचे उमेदवार भिमराव सातपुते यांच्या प्रचारार्थ  प्रचार फेरी व काॕर्नर बैठका घेण्यात आल्या.याफेरीत दलित मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.याफेरी दरम्यान घरोघरी मतदारांशी संवाद साधुन पञक देण्यात आली. दलित मुस्लिम मतदारांनी एकजुट होऊन गॕस सिलेंडरलाच मतदान करणार आसल्याचे अभिवचन दिले.या प्रचार रॕलीत एन.के.सरवदे,मिलिंद घाडगे,प्रसन्नजीत रोडे,रघुनाथ सातपुते,गौतम साळवे,संजय गवळी,पवन सातपुते,गंगाधर गोणे,रमेश घाटोळे व्यंकटी गायके,रंगनाथ गाढवे,राहुल कासारे,साहेब रोडे,चिंतामणी खंडागळे,राजाभाऊ मुंडे ,राजेश बदने आदी गावकरी,नागरिकांना यारॕलीत सहभाग नोंदवला आहे.

No comments:

Post a comment