तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 23 October 2019

परळी विधानसभा निवडणूक कोणाच्या अंगावर पडणार गुलाल ; संपूर्ण राज्याचे लागले लक्षपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या व मुंडे बंधू भगिनींच्या प्रतिष्ठेचा विषय असलेल्या परळी विधानसभा निवडणुकीत कुणाच्या अंगावर गुलाल पडणार हे उद्या होणाऱ्या मतमोणीतुन स्पष्ट होईल. 
        परळी विधानसभा निवडणुकीत भाजपा, सेना महायुतीच्या उमेदवार ना.पंकजाताई मुंडे तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे आघाडीचे उमेदवार ना.धनंजय मुंडे यांच्यात अतिषय अटीतटीची लढाई झाली. 21 आँक्टोंबर रोजी मतदान झाले तर उद्या 24 आँक्टोंबर रोजी परळी येथील कल्ब बिल्डिंग मध्ये मतमोजणी होणार आहे. पंकजाताई मुंडे यांनी प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तर खा.उदयनराजे भोसले यांच्या जाहीर सभा घेण्यात आल्या. तर विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांनी उमेदवारी अर्ज भरतांना तसेच प्रचार समारोप सभेत भव्य शक्ती प्रदर्शन करून आपल्या मागे मतदारांची ताकत असल्याचे दाखवून दिले. 
       2014 विधानसभा निवडणुकीत ना.पंकजाताई मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचा पराभव केला होता. परंतु 2019 विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी तगडी फाईट देत पंकजाताई मुंडे यांच्या समोर आवाहन उभे केले आहे. दोन्ही बाजूंनी नेते, कार्यकर्ते विजयाचा दावा करीत आहेत. परंतु कुणाच्या अंगावर गुलाल पडणार हे उद्या मतमोणीतुन दिसणारच आहे.

No comments:

Post a comment