तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 20 October 2019

लोकशाहीच्या उत्सवासाठी यंत्रणा तत्पर..
: सातही विधानसभा मतदारसंघात पोलींग पार्टी मतदान केंद्रावर
: प्रशासनाकडून मतदारांनी मतदान करण्याचे आवाहन
बुलडाणा, दि. 20 :  जिल्ह्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी अर्थातच लोकशाहीच्या उत्सावाकरिता प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. सर्व सातही विधानसभा मतदारसंघात पोलींग पार्टी बसेसद्वारे मतदान केंद्रांवर पोहचल्या आहेत.  बुलडाणा विधानसभा मतदारसंघातील 335 मतदार केंद्रावर बुलडाणा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मतदानाचे सर्व साहित्य मतदान केंद्रावर पोहचले  असून निवडणुकीची संपूर्ण तयारी झाली आहे. मतदानासाठी बॅलेट युनीट 2718, कंन्ट्रोल युनीट 2718 व व्हीव्हीपॅट 2944 सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. तसचे 2263 मतदान केंद्रांवर सुविधा पुरविण्यात आल्या आहेत.
       बुलडाणा मतदार संघातील सखी मतदार केंद्राच्या कर्मचा-यांना बुलडाणा विधानसभा निवडणुकीत निर्णय अधिकारी राजेश्वर हांडे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व्ही.एस.कुमरे, संतोष शिंदे यांच्या हस्ते निवडणूक साहित्य देऊन त्यांना निवडणूक कामाला शुभेच्छा दिल्या.
      लोकशाहीच्या उत्सवाचा उत्साह शिगेला पोहचला असून  या उत्सवात सक्रीय सहभाग घेवून मतदारांनी 21 ऑक्टोंबर 2019 रोजी सकाळी 7 ते सायं 6 वाजेदरम्यान मोठ्या संख्येने मतदान करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. निरूपमा डांगे यांनी केले आहे. प्रत्येक मतदासंघात 7 सखी, 7 आदर्श मतदान केंद्र असणार आहे.
-1950 हेल्पलाईन दिमतीला
 निवडणूक प्रक्रियेत सुसूत्रता आणि मतदारांच्या उपयुक्ततेसाठी भारतीय निवडणूक आयोगाने 1950 ही हेल्पलाईन कार्यान्वीत केली आहे. ही हेल्पलाईन 24 तास सुरू आहे. या हेल्पलाईनवरून नागरिक मतदान व निवडणूकसंबधीची माहिती घेवू शकतात, नवीन मतदार नोंदणीसह मतदारांच्या शंकांचे निरसन, मतदान ओळखपत्रात बदल किंवा स्थलांतर झालेले असल्यास मतदान यादीत नाव नोंदणीसाठी मार्गदर्शन, मतदान ओळखपत्र आणि मतदार अर्जाशी निगडीत सर्व माहिती उपलब्ध, निवडणूक संदर्भातील तक्रार करता येणार आहे.
-ही असणार सखी व आदर्श मतदान केंद्र
 मलकापूर मतदारसंघात 202 वाकोडी, बुलडाणा मतदारसंघात 212 श्री शिवाजी विद्यालय बुलडाणा, चिखली मतदारसंघात 206 नगर परिषद मराठी प्राथमिक शाळा खोली क्रमांक 1 चिखली, सिंदखेड राजा मतदारसंघात 229 नगर परिषद उर्दू हायस्कूल, मेहकर मतदारसंघात 97 विवेकानंद नगर, खामगांमध्ये 172 एमजेपी खामगांव आणि जळगांव जामोद मतदारसंघात 58 शिवाजी विद्यालय जळगांव. आदर्श मतदान केंद्र : मलकापूर - 132 धानोरा, बुलडाणा - 188 भारत विद्यालय, चिखली - 190 नगर परिषद मराठी प्राथमिक शाळा पुंडलिक नगर चिखली, सिंदखेड राजा - 227 नगर परिषद कार्यालय सिंदखेड राजा, मेहकर - 125 डोणगांव, खामगांव - 123 जेव्ही मेहता स्कूल खामगांव आणि जळगांव जामोद - 130 ग्राम पंचायत इमारत आसलगांव. तसेच बुलडाणा मतदारसंघात 193 नगर परिषद शाळा बुलडाणा येथे दिव्यांग मतदारांसाठी विशेष मतदान केंद्र असणार आहे. 
          - मतदानासाठी यामधील लागणार एक पुरावा
मतदानाला येताना मतदारांनी मतदान चिठ्ठीसह मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, वाहन चालक परवाना, छायाचित्रे असलेले कर्मचारी ओळखपत्र, छायाचित्र असलेले बँक पासबुक, पॅन कार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवहीनुसार मिळालेले स्मार्ट कार्ड, मनरेगा कार्यपत्रिका, कामगार मंत्रालयाचे आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, छायाचित्र असलेले निवृत्त वेतन दस्ताऐवज, खासदार / आमदार यांनी दिलेले ओळखपत्र आणि आधार कार्ड या 11 ओळखीच्या पुराव्यापैकी एक पुरावा सोबत आणावा लागणार आहे.
                                                                        ________-
         मतदान पथकातील कर्मचाऱ्यांची 22 ऑक्टोंबरची अनुपस्थिती असणार कर्तव्य कालावधी
बुलडाणा, दि. 20 :  विधानसभा निवडणूक कार्यक्रमानुसार 21 ऑक्टोंबर 2019 रोजी मतदानाची प्रक्रिया सातही विधानसभा मतदारसंघात पार पडणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या पत्रानुसार निवडणूक कर्तव्याकरिता मतदान केंद्रावर नियुक्त केलेले अधिकारी व कर्मचारी यांचा 22 ऑक्टोंबर रोजीचा अनुपस्थितीचा कालावधी कर्तव्य कालावधी म्हणून समजण्यात येणार आहे. त्यामुळे मतदान संपल्यानंतर 22 ऑक्टोंबर रोजीचा कालावधी कर्तव्य कालावधी असणार आहे, असे जिल्हाधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

            जमील पठाण
  8805381333

No comments:

Post a comment