तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 6 October 2019

ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली परळी शहरास परिपुर्ण पाणीपुरवठ्याचा प्रयत्न-सौ.प्राजक्ता कराड


धी) :- मागील 5 वर्षात शासनाने परळी शहराच्या पाणी उपलब्धतेसाठी कायमस्वरुपी वाढीव शाश्‍वत पाणीसाठा उपलब्ध केलेला नव्हता. यामुळे यावर्षीच्या दुष्काळामुळे वाणधरणातील पाणी संपल्यामुळे परळी शहरात पाणीटंचाई निर्माण झाली. अशा या परिस्थितीत राज्याचे विधानपरीषद विरोधीपक्ष नेते ना.धनंजय मुंडे यांनी शासनदरबारी प्रयत्न करुन प्रसंगी सरकारला धारेवर धरत परळी शहरासाठी तात्काळ पाणीपुरवठ्या संदर्भात उपाय योजना करण्यास भाग पाडले. यामुळे मागील उन्हाळाभर परळीकरांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करता आला. याव्यतिरिक्त ना.धनंजय मुंडे यांनी बारामती व इतर ठिकाणाहून संस्था व खासगी टँकर उपलब्ध केल्याने परळी शहराची तहाण भागली असून भविष्यात परळीची वाढीव पाणीपुरवठा योजना लवकर पुर्ण करु असा विश्‍वास न.प.च्या पाणीपुरवठा सभापती सौ.प्राजक्ता कराड यांनी व्यक्त केला आहे.
यावर्षी कधी नव्हे ते परळी शहरास पाणीटंचाईस सामोरे जावे लागले. परळी शहराचा पाणीपुरवठा फक्त नागापुर येथील वाणधरणावर अवलंबून आहे. वाणधरणातील पाणीसाठा संपल्याने परळीवर पाणीबाणी परिस्थिती बेतली. या काळात परळी करांच्या या समस्येचे गांभीर्य ओळखून विधानपरिषद विरोधीपक्ष नेते ना.धनंजय मुंडे यांनी अपात्कालीन पाणीपुरवठ्यासाठी परभणी जिल्ह्यातील खडका बंधार्‍यातून पाणीपुरवठा करण्याची मागणी दि.1 मे रोजी केली होती. परंतु या कालावधीत शहरात तिव्र पाणीटंचाई जाणवत असल्याने परळी नगर पालिकेला वाढीव टँकरची गरज होती. ना.धनंजय मुंडे यांनी सरकार दरबारी प्रयत्न करत प्रसंगी सरकारला धारेवर धरत परळीसाठी टँकर मंजूर केले. याबरोबरच स्वतःची सेवाभावी संस्था व बारामती अ‍ॅग्रो क्लचर सारख्या सामाजिक संस्थांकडून परळी शहरासाठी टँकर उपलब्ध करुन दिले. यामुळे उन्हाळ्यात परळीकरांना पाणीपुरवठा करणे शक्य झाले. अशा या काळात शहरातील नगरसेवक त्या-त्या भागात आवश्यक त्या ठिकाणी टँकरची मागणी करत नागरीकांना पाणीपुरवठा करत होते. यानंतर परळी व परिसरात पाऊस उशिरा सुरु झाल्याने पाणी टंचाई कायम होती अशा या परिस्थितीत आवश्यक त्या ठिकाणी बोअर घेण्यात आले. सध्या खडका येथील बंधार्‍यातून शहराला अपातकालीन परिस्थितीत पाणी मिळावे यासाठी मंजूरी मिळालेली असून भविष्यात पाणीटंचाईची परिस्थिती उद्भवली तर खडका बंधार्‍यासह इतर पर्यायी पाणी स्त्रोतांचा वापर करण्यात येईल. परळीकरांना उन्हाळाभर आवश्यक त्या ठिकाणी पाणीपुरवठा करण्यासाठी व त्यासाठी शासनदरबारी आवश्यक ती तरतुद करण्यासाठी सक्षम असलेले विधानपरिषद विरोधीपक्ष नेते ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व पदाधिकारी काम करणार असल्याचे न.प.पाणीपुरवठा सभापती सौ.प्राजक्ता भावड्या कराड यांनी सांगितले.

No comments:

Post a comment